Pradeep Kurulkar case  sarkarnama
पुणे

Pradeep Kurulkar-Pakistani Hasina: आरोपपत्रातील 'ती' खास गोष्ट: पाकिस्तानी हसीनाला प्रदीप कुरुलकर म्हणायचे...

DRDO News : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हनीट्रॅपच्या बेबीच्या जाळ्यात अडकले.

सरकारनामा ब्यूरो

Pradeep Kurulkar - Pakistani Hasina : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हनीट्रॅपच्या बेबीच्या जाळ्यात अडकला. त्याने देशाच्या सुरक्षेसंदर्भात असलेली संवेदनशील माहितीही त्याने पुरवली. या पाकिस्तानी तरुणीने त्याच्याकडून सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची माहितीही काढून घेतली. पण मे महिन्यात या सर्व गोष्टींचा पर्दाफाश झाला आणि कुरुलकरला अटक करण्यात आली.

विशेष तपास पथकाने केलेल्या दोन महिन्यांच्या चौकशीत कुरुलकरविरोधात भक्कम पुरावा जमा केले. तपास पथकाने त्याच्या विरोघात आता पुणे जिल्हा न्यायालयात सुमारे दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्या आरोपपत्रात अनेक गोष्टींचाही उल्लेख करण्यात आला आहे. आरोप पत्रातून एक खास गोष्ट समोर आली आहे. (Pradeep Kurulkar)

प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हसीनाला 'ड्रीम गर्ल' म्हणायचा. तर ती हसीना कुरुलकरला 'बेब'म्हणायचा. पाकिस्तानी हसीनाने कुरुलकरशी सोशल मीडियावर जोडण्यासाठी वेगवेगळ्या नावांनी बनावट खाती तयार केली होती. यापैकी दोन नावं होती झारा दासगुप्ता आणि जुही अरोरा.झारा दासगुप्ता नावाने आयडी तयार करून प्रदीपशी बोलणाऱ्या हसीनाने सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचेही त्याला सांगितले होते.

एवढेच नाही तर झाराने प्रदीपशी मैत्री केली आणि ब्रह्मोस लाँचर, अग्नी मिसाईल लॉन्चर आणि मिलिटरी बिडिंग सिस्टम, ड्रोन, यूसीव्ही आणि इतर गोष्टींची माहिती काढून घेतली. त्यानंतर प्रदीपने ही सर्व माहिती गोळा करून पाकिस्तानी एजंटला पाठवली.कुरूलकरने व्हॉट्सअप चॅट आणि तीन ई-मेलच्या माध्यमातून कुरुलकरने पाकिस्तानी हसीनाला संवेदनशील माहिती दिली. dreamgirl56@gmail.com। या नावाने पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ता करुलकरशी संवाद साधायची. दोघांकडेही या मेल आयडीचा पासवर्ड होता. त्याने तिच्याशी शारीरीक संबंधांचीही मागणी केली होती.

याशिवाय, झारा दासगुप्ता या नावाने प्रदीप कुरुलकरशी संपर्क साधायची. कुरुलकरचे इतर महिलांशीही संबंध होते. तो डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना बोलवायचा. दोन महिलांनीही यासंदर्भात दिला आहे. 1837 पानांच्या आरोपपत्रात समाविष्ट असलेल्या एका चॅटमध्ये, पाकिस्तानी एजंटांनी अग्नी-6 लाँचर चाचणी यशस्वी झाली का, असे विचारले, ज्यावर त्यांनी उत्तर दिले: "लाँचर हे माझे डिझाइन आहे. हे एक मोठे यश आहे. कुरुलकर आणि पाकिस्तानी एजंट्समधील ही चॅट सप्टेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यानची आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT