Yashomati Thakur News : दलबदलू राणा दाम्पत्यामुळे अमरावती जिल्हा बदनाम; यशोमती ठाकूरांनी साधला निशाणा

Yashomati Thakur Vs Navnit Rana : स्वतःची लायकी तपासून पवारांवर बोलण्याच्या सदाभाऊ खोत यांना सल्ला
Yashomati Thakur, Ravi Rana, Navmneet Rana
Yashomati Thakur, Ravi Rana, Navmneet RanaSarkarnama
Published on
Updated on

Yashomati Thakur Criticize Navneet Rana : शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते रविवारी (ता. ९) रात्री अमरावतीमध्ये दाखल झाले. ठाकरे यांचे काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये स्वागत केले. तत्पुर्वी, त्यांनी राणा दाम्पत्यासह सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेतला. (Latest Political News)

अमरावती येथे उद्धव ठाकरे यांच्या स्वगतासाठी बॅनर्स लावले होते. ते बॅनर्स खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फाडले. राणा दाम्पत्याच्या या कृतीचा आमदार यशोमती ठाकूर यांनी कडक शब्दात समाचार घेतला. त्यांच्यामुळे अमरावती जिल्हा बदनाम झाल्याचा आरोप ठाकूर यांनी यावेळी आरोप केला.

Yashomati Thakur, Ravi Rana, Navmneet Rana
BJP-Congress News : भाजप पदाधिकाऱ्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यालाच घातला 2 लाखांचा गंडा ; मुरबाडमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाकूर म्हणाल्या, "राणा दाम्पत्याने आता आत्मचिंतन करावे. जे स्वतः दलबदलू आहेत. ते कायमच गोंधळ घालत असतात. ज्यांच्या मतांवर निवडून येतात त्यांचा ते सन्मान करत नाहीत. त्यामुळे ते कुणाचाही सन्मान करणार नाहीत. अमरावतीत विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. आमरावतीची काही मंडळी संविधानाचा आराखडा तयार करण्याच्या समितीत होती. या लोकांनी मात्र अमरावतीला बदनाम केले. 'जिधर बम उधर हम' असा त्यांचा विषय आहे."

Yashomati Thakur, Ravi Rana, Navmneet Rana
AIMIM News : ओवेसी आता समान नागरी कायद्याच्या विरोधात मैदानात उतरणार..

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना शैतान असा उल्लेख केला. यावर चिल्लर व्यक्ती खोत यांच्यावर ठाकूर यांनी कडक शब्दात टीका केली. ठाकूर म्हणाल्या, "शरद पवार हे खंबीर नेतृत्व आहे. सगळे उन्हाळे-पवासाळे त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी स्वतःची लायकी तपासावी नंतर पवार यांच्यावर बोलावे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com