Shinde-Fadanvis Government :  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Contract Recruitment : कंत्राटी भरतीचा निर्णय योग्यच, पण... ; अजित पवार थेट बोलले

Shinde-Fadanvis Government : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यात येत असल्याचे काल जाहीर केले

अनुराधा धावडे

Pune Political News : कंत्राटी भरतीचा निर्णय हा मागच्या सरकारांचा होता. त्यांचे पाप आपल्या माथी नको, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर रद्द केला. कंत्राटी भरतीच्या निर्णयावरून विरोधकांनी रान उठवल्यानंतर फडणवीसांनी अखेर काल निर्णय मागे घेतला; पण कंत्राटी भरतीचा निर्णय योग्य होता, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय योग्य होता, पण विरोधकांनी या संदर्भात गैरसमज पसरवला. तरुणांच्या नोकऱ्या जाणार, त्यांना नोकऱ्याच मिळणार नाहीत,असा गैरसमज पसरवला गेला. त्यामुळे आम्हाला हा निर्णय मागे घ्यावा लागला, असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण आमच्या सरकारने दीड लाख कंत्राटी भरतीचा घेतलेला निर्णय योग्य होता. दीड लाख तरुणांना यातून नोकरीची संधी होती. मी अनेकांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे, पण तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही भरती झाली नव्हती; पण तरुणांच्या मनात गैरसमज पसरवण्यात आला. त्या दिवशी झालेल्या बैठकीत फडणवीसांनी स्वत: पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?

"कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय १३ मार्च २००३ ला झाला होता.'सर्व शिक्षण योजनें'तर्गत शिक्षण विभागात कंत्राटी भरती झाली होती. तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हण यांच्या काळातही सहा हजार पदांची कंत्राटी भरती केली गेली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात २०१४ मध्येही १२६९ पदे कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला होता." असे फडणवीस म्हणाले.

कंत्राटी भरतीबाबत विरोधक गदारोळ करत आहेत, पण तेच दोषी आहेत. ज्यांनी हे पाप केले तेच आज या कंत्राटी भरतीविरोधात आवाज उठवत आहेत. खरे तर दोषींचे थोबाड उघडे पडले पाहिजे, अशी टीका फडणवीसांनी केली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT