Sangamner Politics : 'शेतकऱ्यांचा आनंद काहींना पाहवला नाही'; बाळासाहेब थोरातांची टीका कोणावर ?

Congress-BJP Politics : संगमनेर तालुका स्वातंत्र्य सैनिकांचा आणि क्रांतिकारक असल्याने या कठीण परिस्थितीला कसे सामोरे जायचे, हे अवगत आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Nagar Political News : 'धरण व कालवे हे शेतकऱ्यांसाठी आहेत. यातून शेतकऱ्यांनाच पाणी मिळणार असल्याने संगमनेरमध्ये शेतकरी आनंदोत्सव साजरा करत होते. तो काहींना पाहवला नाही आणि त्यावेळी पाणी बंद केले', काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता निळवंडे धरणातील पाण्यावरून टोला लगावला. या वेळी आमदार थोरात यांनी समन्यायी पाणीवाटपाचे तत्त्व मान्य नसल्याचेही म्हटले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 2023-24 या गळीत हंगामाच्या बाॅयलरचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार थोरात यांनी समन्यायी पाणीवाटपावर भाष्य केले. कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ अध्यक्षस्थानी होते.

Balasaheb Thorat
Raksha Khadse News : 'रावेर' बाबत रक्षा खडसेंचं मोठ विधान; म्हणाल्या, "एकनाथ खडसे हे नाव माझ्या पाठीमागे असल्यानं..."

आमदार थोरात म्हणाले, "समन्यायी पाणी वाटपाचे तत्त्व आपल्याला मान्य नाही. हे तत्त्व काळजीवाहू सरकारच्या काळात अधिकारी पातळीवर ठरवले गेले. हे तत्त्व आपल्याला मान्य नाही. या विरोधात संगमनेरनेच प्रथम आवाज उठवला, आंदोलने केली. निळवंडे धरण आणि कालवे हे आपण दुष्काळी भागातील जनेतासाठीच बांधले आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, यासाठी हे काम पूर्ण केले आहे. (Thorat-Vikhe Conflict)

मे महिन्यामध्ये दहा टीएमसी पाणी शिल्लक होते. त्यावेळी सर्व बंधारे, नाले भरता आली असती. परंतु संगमनेर तालुक्यात साजरा झालेला आनंदोत्सव काहींना पाहवला नाही. त्यावेळेस पाणी बंद केले". सध्या अनेक अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. संगमनेर तालुका स्वातंत्र्य सैनिकांचा आणि क्रांतिकारक असल्याने या कठीण परिस्थितीला कसे सामोरे जायचे, हे अवगत आहे. पुढील काळात काँग्रेसचे सरकार येणार आहे, असेही आमदार थोरात यांनी सांगितले.

दुष्काळामुळे यंदाचा हंगाम कठीण...

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची गेल्या 56 वर्षांत अत्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. नवीन कारखान्यातून गेल्या सात वर्षांत 73 मेट्रिक टनाचे गाळप झाले. यावर्षी पाऊस कमी आहे. दुष्काळी परिस्थिती आहे. हा हंगाम कठीण होणार आहे. तरी शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे या दुष्काळालादेखील तोंड देऊ, असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

Edited By- Anuradha Dhawade

Balasaheb Thorat
Nilesh Lanke News : 'जनतेच्या मनातील खासदार' नीलेश लंके धर्मसंकटात; लोकसभेसाठी 'साहेबांचा हात' की निधीसाठी 'दादांची साथ'?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com