Sarpanch and upsarpanch News  Sarkarnama
पुणे

Pune Politics : गावकारभाराची जबाबदारी बहीण-भावावर; बहीण सरपंच तर भाऊ उपसरपंच

Sarpanch and upsarpanch News : राजकारणातील अनोखा योगायोग; या योगायोगाची राज्यात चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे. मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार आता बहीण-भाऊ पाहणार आहे. त्यामुळे या योगायोगाची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे.

मुळशीच्या भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची निवड झाली आहे. त्यामुळे भाऊ-बहिण सरपंच आणि उपसरपंच होण्याचा हा दुर्मिळ योगायोग पाहायला मिळाला आहे.

भुकूम गावच्या ग्रामपंचायतीची सरपंच आणि उपसरपंचाची निवडणूक होणार होती. मात्र, गावातील सर्व सदस्यांनी मिळून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निश्चय केला. त्यानंतर गावच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची निवड आधीच झाली होती.

भुकूम ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच मावस बहीण-भाऊ हे सरपंच आणि उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे या अनोख्या योगायोगाची राज्यात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या बिनविरोध निवडीमुळे नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांची मिरवणूक गावकऱ्यांनी काढली. सख्खे मावस बहीण आणि भाऊ सरपंच आणि उपसरपंच झाल्यामुळे अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत.

(Ediited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT