APMC Balapur : २० वर्षांची सत्ता उलथून लावण्यासाठी वंचित-भाजप उतरले मैदानात?

Vanchit : भाजपने वंचितसोबत हातमिळवणी केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Vanchit and BJP in Balapur APMC
Vanchit and BJP in Balapur APMCSarkarnama

अनिल दंदी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने उडी घेतली आहे. सहकार पॅनलची गेल्या २० वर्षांपासूनची असलेली सत्ता उलथून टाकण्याचा निश्चय वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या निवडणुकीत भाजपने वंचितसोबत हातमिळवणी केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर

दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी सत्ताधारी पॅनलसोबत आहेत. बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या २० वर्षांपासून शेतकरी सहकार पॅनलच्या ताब्यात आहे. मात्र त्यांना आता भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने चांगलंच आव्हान दिलं आहे. अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून मतदारांच्या दारात जाण्याची स्पर्धाच लागली आहे.

उमेदवारांमध्ये आट्यापाट्यांचा खेळ..

उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्या नंतर आता खऱ्या अर्थाने या निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही उमेदवार मतदारांच्या घरी जाण्यासाठी पायपीट करीत आहेत. या निवडणुकीत एकूण ७४ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ एप्रिल रोजी ३७ जणांनी माघार घेतल्याने ३७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाजप, वंचित?

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलने प्रथमच आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीवर २००३ पासून शेतकरी सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाजप व वंचितने आपले उमेदवार उभे करून सत्ताधाऱ्यांच्या मनात धाकधूक वाढवून दिली असल्याचे बोलले जात आहे.

Vanchit and BJP in Balapur APMC
Yavatmal APMC Election : यवतमाळात आघाडी, युतीची घडी विस्कटली; बाजार समितीसाठी तिहेरी लढत !

आता वंचित व भाजपचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. मात्र, या निवडणुकीने मातब्बरांची झोप उडवली आहे. येथे सोसायटीसाठी ५३४ , ग्रामपंचायतीसाठी ५८९, अडते व्यापारी १७२, आणि हमाल व्यापारी मतदारसंघात ६७ असे एकूण १ हजार ३६२ मतदार आहेत. एकाच ठिकाणी मतदानाची सुविधा केली आहे.

सर्वसाधारण (शेतकरी) ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात, इतर मागासवर्ग १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात, महिला २ जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात, भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून १ जागेसाठी २ उमेदवार, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ २ जागेसाठी ५ उमेदवार , ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून १ जागेसाठी २ उमेदवार, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ १ जागेसाठी २ उमेदवार, व्यापारी-अडते मतदारसंघ २ जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात, तर हमाल मापारी मतदारसंघातून सरप लक्ष्मण ज्ञानदेव हे अविरोध झाले.

Vanchit and BJP in Balapur APMC
Chandrapur APMC Election : एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आले एकत्र, कुठे 'वज्रमुठ' सैल, कर कुठे ‘हातात’ 'कमळ'

२० वर्षांपासून शेतकरी सहकार पॅनलचे वर्चस्व..

या निवडणुकीत (APMC Election) भाजप आणि वंचितची युती असल्याचे बोलले जात आहे, याबाबत निश्चित सांगता येणार नाही. शेवटी सर्व काही मतदारांवर (Voters) अवलंबून आहे.

- सेवकराम ताथोड, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापूर.

वंचित बहुजन आघाडीने (Vancit Bahujan Aghadi) पहिल्यांदा आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत, असे असले तरी, भाजपशी (BJP) युती झाली नाही. वंचित आणि भाजपची हातमिळवणी झाली, ह्या सगळ्या अफवा आहेत.

- मंगेश गवई, वंचित बहुजन आघाडी.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com