Corona
Corona Sarkarnama
पुणे

पुण्यात आज एकही मृत्यू नाही; ॲक्टिव्ह रूग्ण उरले केवळ ७२७

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यभर दिवाळी उत्साहात साजरी केली जात असताना पुण्यातील कोरोना रूग्णांची संख्यादेखील कमी होऊ लागली आहे. पुण्यात आज केवळ ७२७ ॲक्टिव्ह रूग्ण उरले आहेत.पुण्यातल्या किंवा पुण्याबाहेरच्या एकही मृत्यूची नोंद आज नाही.

शहरात आज दिवसभरात नव्या ९४ जणांना कोरोनाची लागण झाली असून ५४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ९९ क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत.गेल्या वीस महिन्यात पुण्यातील पाच लाख चार हजार ४८९ रूग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी चार लाख ९४ हजार ७८६ रूग्ण बरे झाले.वीस महिन्यात नऊ हजार ७६ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवाळीच्या निमित्ताने राज्य सरकारने जवळपास सर्व निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे बाजारात चैतन्याचे वातावण आहे. पुण्यात आज लक्ष्मीपूजनाची लगबग होती. गेल्यावर्षी दिवाळीत सर्व निर्बंध कायम होते. त्यामुळे नागरीकांना दिवाळी घरातच साजरी करावी लागली. कोरोनाची लाट कमी झाली आणि राज्य सरकारने निर्बंध उठविल्याने पुणेकर यावर्षी दिवाळीची खरेदी आणि दिवाळीचा आनंद घेत आहेत.

लसीकरणातही पुण्याने मुंबईपाठोपाठ आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील जवळपास ४३ लाख जणांनी दोन डोस पूर्ण केले आहेत. येत्याकाही दिवसात लसीकरणाचा वेग वाढविण्यात येणार असून शंभर टक्के लसीकरणाचा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Edited By : Umesh Ghongsde

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT