पुण्यात पेट्रोल ५.८३ पैसे तर डिझल १२ रूपयांनी स्वस्त

केंद्र सरकारने दरकपात करताच भाजापाशासित दहा राज्यांनी आपल्या पातळ्यांवर दरकपात केली आहे.
Petrol
PetrolSarkarnama

पुणे : पेट्रोल आणि डिझलच्या दरात कपात करण्यात आल्यानंतर पुण्यात आज एक लिटर पेट्रोलचा दर १०९ रूपये ५० पैसे तर डिजलचा दर ब्यान्नव रूपये ५० पैसे इतका आहे. पेट्रोल पाच रूपये ८३ पैसे तर डिझल १२ रूपयांनी स्वस्त झाले आहे.

गेली सहा महिने पेट्रोल-डिझलचे दर चढ राहिल्याने नव्वदच्या आसपास असणारे पेट्रोल ११५ रूपयांवर गेले होते. गेल्या काही दिवसांपासून दरकपात करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, राज्य वा केंद्र सरकार दरकपात करण्यात तयार नव्हते. दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने दरकपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी विविध राज्यातील विधानसभा तसेच लोकसभेच्या काही जागांवरील पोटनिवडणुकीतील निकाल लक्षात घेऊन केंद्राने दरकपात करण्याचा निर्णय तातडीने घेतल्याचे दिसत आहे.

Petrol
इंधन दर कपातीमुळे देशभरातील पेट्रोल पंपचालकांचे १२ हजार कोटी पाण्यात

येत्या सहा महिन्यात उत्तरप्रदेशसह सात राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांचा विचार करूनदेखील दरकपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांसह सर्वच राज्यात इंधन दरवाढीवरून जनतेत रोष आहे. जनतेच्या या रोषाकडे अधिक काळ दुर्लक्ष करणे केंद्र सरकारला परवडणारे नाही. त्यामुळे दरकपात करण्यात आली.

Petrol
रेल्वे-बँकिंग, पोलीस आणि ‘एलआयसी’च्या भरतीसाठीही आता मिळणार विद्यावेतन

केंद्र सरकारने दरकपात करताच भाजापाशासित दहा राज्यांनी आपल्या पातळ्यांवर दरकपात केली आहे. मात्र, महाराष्ट्रात राज्याच्या पातळीवर दरकपातीचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने दरात कपात केली तर राज्यातील जनतेला आणखी कमी दरात पेट्रोल व डिझल उपलब्ध होणार आहे. मात्र, केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर तातडीने दरकपातीचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारमधील सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारने निर्णय घेतल्यामुळे राज्य सरकारलाही काहीतरी कपात करावी लागणार आहे. मात्र, तो निर्णय लगेच नको, अशी भूमिका राज्य सरकारकडून घषण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला आणखी दरकपातीसाठी वाट पाहावी लागणार आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com