Smartana Patil, Amol Tambe, Suhail Sharma IPS Latest News
Smartana Patil, Amol Tambe, Suhail Sharma IPS Latest News Sarkarnama
पुणे

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त; सुहेल शर्मा,अमोल तांबे, स्मार्तना पाटील पुण्यात...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील 104 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेले काही दिवस या बदल्या प्रलंबित होत्या. मात्र राज्यात सत्तांतराच्या नाट्यामळे बदल्यांचं वेळापत्रक काहीसं बिघडलेलं आहे. विशेषतः सनदी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या खूपच लांबल्या आहेत. अजूनही काही सनदी अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे बाकी आहे. (Smartana Patil, Amol Tambe, Suhail Sharma IPS Latest News)

दरम्यान, पुण्यातल्या उपायुक्त (DCP)दर्जाच्या बहुतांश अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात पोलीस अधीक्षक तसेच अन्य पदावर चांगलं काम केलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्या मिळाल्याचे झालेल्या बदल्यावरून दिसते. ज्या अधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल गेल्या दोन वर्षात तक्रारी होत्या किंवा माध्यमांमध्ये त्या संदर्भातल्या चर्चा झाल्या होत्या, अशा काही अधिकाऱ्यांना बदलीच्या रूपाने त्याची 'बक्षिसी' मिळाल्याचे या बदल्यांवरून दिसत आहे.

पुणे शहरातील नवीन पोलिस उपायुक्त नियुक्ती आणि इतर बदल्या पुढीलप्रमाणे

  • ए.एच. चवरीया, पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (सी आय डी)

  • संदीप सिंह गिल्ल (पोलिस उपायुक्त)

  • राजेश बनसोडे, पोलिस अधीक्षक, बिनतारी संदेश (वायरलेस)

  • स्मार्तना पाटील (पोलिस उपायुक्त)

  • अमोल तांबे, अधीक्षक, लाचलुचपत विभाग

  • सुहेल शर्मा (पोलिस उपायुक्त)

  • शशिकांत बोराटे (पोलिस उपायुक्त)

  • विक्रांत देशमुख (पोलिस उपायुक्त)

  • राजलक्ष्मी शिवणकर, पोलिस अधीक्षक, लोहमार्ग

  • अमोल झेंडे (पोलिस उपायुक्त)

  • विजय मगर (पोलिस उपायुक्त)

राज्यातील बदल्यांची यादी पुढीलप्रमाणे...

Transfer News
Transfer News
Transfer News
Transfer News
Transfer News
Transfer News
Transfer News
Transfer News
Transfer News

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT