अखेर सत्तारांनी जाहीर सभेत 'त्या' वक्तव्यावर केली दिलगिरी व्यक्त!

Abdul Sattar : सत्तारांच्या घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती.
Supriya Sule & Abdul Sattar Latest News
Supriya Sule & Abdul Sattar Latest NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

सिल्लोड येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अभद्र भाषा वापरली होती. यावरून राष्ट्रवादी कॅाग्रेस चांगलीच आक्रमक झाली आणि सत्तारांच्या घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. यामुळे चांगलचं वातावरण तापलं आहे. मात्र सत्तारांनी सिल्लोड येथील जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकला आहे.

Supriya Sule & Abdul Sattar Latest News
मुख्यमंत्री शिंदेंचा मंत्री-आमदारांवरील कंट्रोल सुटतोय?; 'या' वक्तव्यावरून झाली आतापर्यंत गोची...

हे प्रकरण आणखी चिघळण्याआधीच मंत्री सत्तारांनी सिल्लोडच्या सभेत जाहीर माफी मागावी,असा आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर मंत्री सत्तारांनी अपेक्षेप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेत सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.