Walmik Karad | Trupti Desai  Sarkarnama
पुणे

Trupti Desai Beed Case : 'ते' सगळे पुरावे घेऊन तृप्ती देसाई बीडला जाणार, वाल्मिक कराडच्या मर्जीतील 26 पोलिसांवर कारवाई होणार?

Trupti Desai Evidence Submission : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने सबंध महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.

Sudesh Mitkar

Pune News, 15 March : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने सबंध महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपात संदर्भातील पुरावे आता पोलिसांना सादर करावे अशी नोटीस तृप्ती देसाईंना पाठवण्यात आली आहे.

त्यानुसार सोमवारी त्या याबाबतचे पुरावे देण्यासाठी बीडला (Beed) जाणार आहेत. याबाबतची माहिती देताना तृप्ती देसाई म्हणाल्या, बीडमधील वाल्मिक कराड यांच्या मर्जीतील 26 पोलिसांची यादी मी 27 जानेवारीला जाहीर केली होती. त्याबाबत पोलिस अधीक्षक बीड आणि गृह मंत्रालयात देखील तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन या संदर्भातील पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांकडून मला नोटीस आली आहे. बीड पोलिस अधीक्षकाच्या नोटीसच उत्तर देण्यासाठी सर्व पुरावे घेऊन सोमवारी मी बीड पोलिस ठाण्यात जाणार आहे. ज्या 26 जणांची यादी मी पोलिसांना दिली आहे. त्या पोलिस अधिकार्‍यांबाबतचे पुरावे मी पोलिसांना देणार आहे.

यामध्ये काही ऑडिओ क्लिप तसेच काही व्हिडिओ आणि काही पोलिस तक्रारी आहेत. यातील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) मर्जीनुसार एकाच पोलिस ठाण्यात काम करत आहेत. तर काही भ्रष्टाचारी असून हप्ते गोळा करतात. या संदर्भातील सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मी पुरावे घेऊन जाणार आहे.

मात्र पोलिस अधीक्षक आणि गृहमंत्रालयाला माझी एवढीच मागणी आहे की, पुरावे घ्या. परंतु यामधील जे काही पोलिस अधिकारी आहेत त्यांची तात्काळ बीड जिल्ह्याबाहेर बदली करा आणि ज्यांनी अत्यंत चुकीचं काम केलं आहे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावं.

या लोकांवर कोणाचा राजकीय वरदहस्त असेल अथवा दबाव असेल तर तो बाहेर ठेवला गेला पाहिजे. बीडचा गुंडाराज रोखायचा असेल तर या सर्वांना बीडच्या बाहेर घालवणे महत्त्वाचे आहे, असंही तृप्ती देसाई (Trupti Desai) म्हणाल्या.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT