Pune News: यवत (ता. दौंड) : कडक प्रशासकीय कारभारासाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांच्या नावाचीच धास्ती किती आहे, याचा प्रत्यय यवतमध्ये नुकताच आला. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे अधिकारी तपासणीसाठी येणार असल्याची माहिती पसरताच अनेक दुकानदारांनी घाईघाईने दुकाने बंद केल्याचे पाहायला मिळाले.
गावात FDA विभागाची तपासणी होणार असल्याची चर्चा सुरू होताच हॉटेल्स, स्वीट होम, खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. काही व्यावसायिकांनी दुकाने अर्धवट बंद केली, तर काहींनी थेट शटर खाली ओढले. त्यामुळे काही काळ गावात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
मात्र नंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोणतेही अधिकारी यवतमध्ये आले नसल्याचे स्पष्ट झाले. केवळ तपासणी होणार असल्याच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांनी खबरदारी म्हणून दुकाने बंद केल्याची माहिती समोर आली.
या घटनेमुळे प्रशासनाच्या कडक कारवाईची प्रतिमा आणि त्याचा व्यापाऱ्यांवर असलेला मानसिक प्रभाव पुन्हा चर्चेत आला आहे. अधिकारी प्रत्यक्ष आले नसतानाही तपासणीच्या शक्यतेने व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेली धावपळ हा चर्चेचा विषय ठरला.
केवळ तपासणी होणार असल्याच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने बंद ठेवल्याचे सांगितले जाते. स्थानिक पातळीवर अशीही चर्चा रंगली की, प्रशासनाच्या कडक कारवाईच्या प्रतिमेमुळे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्यांच्या नावाचा प्रभाव कायम असल्याचे या घटनेतून दिसून आले.या संपूर्ण प्रकारामुळे शहरात काही काळ उत्सुकता आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते.
तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून त्यांनी धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. हॉटेलांपासून ते रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांपर्यंत अन्न व औषध प्रशासनाची नजर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.