Nashik MLC Election: गोकुळ गीते यांची माघार, भाव मात्र गिरीश महाजन यांचा वधारला

Gokul Geete Withdraws from Nashik MLC Election: नाशिक विधान परिषद निवडणुकीतून गोकुळ गीते यांनी माघार घेतल्यानंतर राजकीय समीकरणांना वेग आला आहे. गिरीश महाजन यांच्या भूमिकेची आणि महायुतीतील राजकारणाची चर्चा रंगली आहे.
Gokul Geete Withdraws from Nashik MLC Election
Gokul Geete Withdraws from Nashik MLC Election Sarkarnama
Published on
Updated on

Gokul Gगte News: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीतून बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी माघार घेतली आहे. बुधवारी (10 जून) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर आणि मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या यशस्वी मनधरणीनंतर गिते यांनी माघार घेतली आहे. आज (11 जून) रोजी याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

एका बाजूला महायुतीच्या विरोधातील शस्त्रे म्यान झाली आहेत. पण दुसऱ्या बाजूला गोकुळ गिते यांनी आपल्या राजकीय प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून घेतले आहे. तिसऱ्या बाजूला गिते यांच्यासोबत मागील आठवड्याभरापासून सुरु असलेली चर्चा नियोजित राजकारणाचा भाग होता की मंत्री महाजन यांचे महत्त्व वाढविण्याचा डाव यावर चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या आठवडाभर आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी गिते यांच्या वडिलांचा अवमानजनक उल्लेख केला. तो विषय गिते यांनी प्रतिष्ठेचा केला. शेवटी मात्र कुणाल दराडे बोलले तेच घडले हे या राजकारणाचे सार आहे, हे नाकारता येत नाही.

Gokul Geete Withdraws from Nashik MLC Election
Pune News: PMC च्या 5 शाळांसाठी 101 कोटींचा प्रस्ताव; खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध

दरम्यानच्या काळात गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांच्यावर आणि त्यांच्या पाठीराख्यांवर अनेक वार केले. नरेंद्र दराडे यांनी आपल्या आमदारकीचा वापर कशासाठी केला? हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचे उत्तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि खुद्द दराडे यांच्याकडे देखील नाही.

Gokul Geete Withdraws from Nashik MLC Election
Mantralaya Restructuring: मंत्रालयात मोठा बदल! 33 ऐवजी 45 विभाग; निर्णय प्रक्रियेला मिळणार वेग

मतदारांचा भाव एकदम पडणार?

नरेंद्र दराडे यांच्या विषयी विधान परिषदेच्या मतदारांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी आहे. हे गिते वारंवार सांगत होते. गिते यांच्याच उमेदवारीने या मतदारांना सोन्याचा भाव आला होता. पण त्यांच्याच माघारीने या मतदारांचा भाव एकदम पडणार आहे.

निवडणुकीचा निकाल काय लागतो याची या मतदारांना आधीही चिंता नव्हतीच. पण आता अपेक्षेप्रमाणे स्वतःचे उखळ पांढरे होणार नाही हीच खंत असेल. यानिमित्ताने नरेंद्र दराडे यांच्यावर झालेले अकार्यक्षमता आणि आर्थिक गैरव्यवहार या आरोपांचे पुढे काय? ही चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com