Methanol Poisoning Case : पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या विषारी दारू प्रकरणात आता राज्याचे कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची एन्ट्री झाली आहे. मुढें यांच्या अन्न व औषध प्रशासनाने या विषारी दारू प्रकरणात तब्बल 20 लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरेलल्या भिवंडीच्या 'रेक्स इंटरनॅशनल' या मिथेनॉल उत्पादक कंपनीचा परवाना रद्द केला आहे.
'रेक्स इंटरनॅशनल' कंपनीसह राज्यभरातील 937 मिथेनॉल उत्पादकांच्या तपासण्याची धडक मोहीम अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतली आहे. तर हातभट्टीमध्ये मेथेनॉल मिश्रणामुळे विषारी दारु दुर्घटना होते. यामुळे 1968 पासून राज्यात विषारी दारूचे तब्बल 434 बळी गेलेत. या सर्वांच्या मृत्यूला मिथेनॉल भेसळ केलेली दारू कारणीभूत ठरली आहे.
मिथेनॉल हे एक प्रकाराचे विष असून त्याचे विक्रीचे व साठा करण्याची एक सुनिश्चित अशी पद्धती कायद्याने नेमून दिलेली आहे. त्यावर अन्न व औषध प्रशासन नियंत्रण ठेवते. मात्र सध्या सर्व नियम धाब्यावर बसवत मिथेनॉल कंपन्या कशीही विक्री करतात आणि ते स्वस्तात मिळत असल्याने दारू उत्पादन करणारे त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
याच मिथेनॉलच्या अतिवापरामुळे पुण्यात नुकतीच मोठी दुर्घटना घडली. या विषारी दारुकांडातील आरोपींनी भिवंडी येथील रेक्स इंटरनॅशलकडून मिथेनॉल खरेदी केलं होतं. त्यानंतर या कंपनीचा 5 हजार 229 किलो मेथेनॉल साठा जप्त करण्यात आला आहे. तर कंपनीचा मालक अरुणकुमार चौबेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुण्यातील दारू प्रकरणी तुकाराम मुढेंच्या विभागाने मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मेथेनॉल विक्री करण्यापूर्वी त्यामध्ये रंग आणि कडू चवीचे मिश्रण करण्याची उत्पादकांवर सक्ती करण्याबाबत 2011 मध्ये राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेला 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती दिली होती. यावर अधिसूचनेला रासायनिक कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्यावर स्थगित आली.
मात्र, आता ही अधिसूचना कायम ठेवाण्यासाठीचे प्रतिज्ञापत्र विशेष अनुमती याचिकेच्या अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. तसंच मिथेनॉल उत्पादकांनी महाराष्ट्र विष कायदा 1972 च्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.
अन्यथा विषय कायदा व भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात येतील आणि त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी कठोर भूमिका अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.