Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी मोठा ट्विस्ट, नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी? सुनेत्रा पवार अन् फडणवीसांच्या भेटीमुळे वेगळीच चर्चा

Rajya Sabha Bypoll Maharashtra : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या याच राज्यसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी फील्डिंग लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Former MP Navneet Rana's name is being discussed for the Rajya Sabha bypoll in Maharashtra following Sunetra Pawar's resignation.Sarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha Bypoll Maharashtra : राज्यात एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता दुसरीकडे राज्यसभेच्या निवडणुकीच्या जोरदार घडामोडी सुरू आहेत. देशभरातील राज्यसभेच्या 24 रिक्त जागा आणि पोटनिवडणुकीसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत.

यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यातील जागांचा समावेश आहे. यासह महाराष्ट्रातील आणि तामिळनाडूमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील 18 जून रोजी पार पडणार आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या याच राज्यसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी फील्डिंग लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.

Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Gokul Politics : महायुतीला कोर्टात तोंडावर पडण्याची भीती अन् रात्रीत फिरला गेम : गोकुळमधील ४२७ अपात्र संस्थेतील २७० संस्था पुन्हा पात्र

राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसंच राणा यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Sunetra Pawar : मुलाची बिनविरोध निवड होताच तटकरे देवगिरीवर; अजितदादांच्या फोटोसमोर उभं राहिलेला फोटो ट्विट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या, "विश्वासाला..."

त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी नवनीत राणा यांचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी राष्ट्रवादी आपल्या कोट्यातील राणा यांच्यासाठी सोडणार की पक्षातील कोणाला या जागेवर पाठवणार? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कोट्यातील राज्यसभेच्या या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाची देखील चर्चा सुरू होती. तसंच सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांची नावे देखील चर्चेत आहेत. त्यामुळे आता पक्षाच्या अंतर्गत बैठकीत नेमकं कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com