Tukaram Mundhe alcohol complaint Sarkarnama
पुणे

Tukaram Mundhe : 'दारुची चव बरोबर नाही...', तुकाराम मुंढेकडे आली अजब तक्रार, स्वतःच सांगितला किस्सा

Tukaram Mundhe liquor complaint : पुण्यात झालेल्या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी एफडीएकडे येणाऱ्या अजब तक्रारींविषयी सांगितले.

Roshan More

Tukaram Mundhe alcohol taste complaint: तुकाराम मुंढेनी सुत्र हातात घेतल्यानंतर एफडीएच्या कारवाईचा धडाका सुरू आहे. मात्र, या कारवाईच्या धडाक्यात गमतीशिर प्रसंग देखील घडत असल्याचे मुढेंनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितले.

मुंढे म्हणाले की, 'मी जेव्हा एफडीएमध्ये काम सुरू केले तेव्हा टोल फ्री क्रमांक दिला होता. टोल फ्री क्रमांक 24 तास सुरू असतो. त्यानंतर माझे कर्मचारी माझ्या ऑफसमध्ये आले.त्यांनी तक्रार केली रात्री सर्वसाधारण ११ आणि १२ च्या दरम्यान विचित्र काॅल येतात.'

पुढे बोलताना ते म्हणाले, 'मी जेव्हा त्यांना विचारले की नेमके कसले काॅल येतात तेव्हा त्यांनी सांगितले की, रात्री काॅल करणारे व्यक्ती तुमचा नंबर मागतात. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तक्रार द्या आम्ही कारवाई करू. तेव्हा ते म्हणतात की, आम्ही आता ड्रींक करतो आहोत.मात्र, ड्रींकची टेस्ट बरोबर नाही. तुम्ही कारवाई करा.'

'एफडीए'ने तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक सुरू केला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हायकोर्टाच्या कँटीनपासून ते शासकीय कार्यालयांपर्यंत सर्वत्र नियमानुसारच तपासणी सुरू आहे. अन्न उद्योगाने नियमांचे पालन करणे, एफडीएने नियमन करणे आणि ग्राहकांनी सजग राहणे यातूनच ही व्यवस्था बदलेल,' असे आवाहन मुंढे यांनी केले.

बदल्यांचा त्रास होत नाही

वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मला त्रास होत नाही. उलट बदल हा प्रगतीचा अविभाज्य भाग असून, माझ्या जितक्या जास्त बदल्या होतील, तितके अधिक सकारात्मक बदल घडतील,' अशी रोखठोक भूमिका तुकाराम मुंढे यांनी मांडली.

बीयर आणू का?’ प्रश्नाने दिल्ली सोडली

युपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेलो होतो मात्र नंतर दिल्ली सोडली त्याचे कारण देखील मुढेंनी सांगितले. ते म्हणाले, 'युपीएससी'च्या तयारीदरम्यान १९९६ मध्ये पहिल्यांदा दिल्लीला गेलो. दिल्लीतील जवाहर बुक डेपोमधून पुस्तके घेतल्यानंतर पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या वेळी वेटरने ‘बीयर आणू का?’ असे विचारताच मला संताप आला. मी तातडीने बॅग पॅक केली आणि रेल्वे स्थानक गाठले. तिकीट नसतानाही कर्नाटक एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून टॉयलेटजवळ बसत भुसावळपर्यंत प्रवास केला आणि तेथून बसने संभाजीनगर गाठले.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT