Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवाईचा 'गोकुळ'ला फायदा? हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

Hasan Mushrif On Tukaram Mundhe : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धाडसत्राचे कौतुक केले. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाला फायदा झाल्याचंही ते म्हणाले.
Hasan Mushrif On Tukaram Mundhe
Hasan Mushrif On Tukaram MundheSarkarnama
Published on
Updated on

Tukaram Mundhe : नंदुबार दौऱ्यावर असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर सुरु केलेल्या धाडसत्रामुळे कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाला फायदा झाल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार जिल्ह्यात विविध विकासकामांचे उद्घाटन केले. दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे राज्यातील दूध उत्पादनात 25 टक्क्यांची घट झाली असून त्याचा फायदा गोकुळला झाल्याचे मिश्कील भाष्य केलं. गोकुळच्या दुधाची मागणी वाढल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे एकंदरीत तुकाराम मुंढे गोकुळला पावले असे चित्र असल्याचे त्यांनी मिश्कीलपणे नमूद केले.

मुश्रीफ पुढे म्हणाले, काल रेल्वेने येताना काही लोक भेटले. ते सांगत होते, तुकाराम मुंढेंना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदावर आणखी काही वर्ष ठेवलं तर लोकांचे आयुर्मान पाच वर्षांनी वाढेल. मी म्हणालो पाच काय दहा वर्षांनी वाढेल. तुकाराम मुंढे यांच्यासारखे सर्व अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. निदान जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. सध्या पनीरही दिसत नाही. त्यामुळे किती भेसळ होत होती, लोकांच्या जीवनाशी कसा खेळ सुरु होता हे दिसतं.

Hasan Mushrif On Tukaram Mundhe
Gokul Dudh Sangh: गोकुळ निवडणुकीत ‘प्रेशर पॉलिटिक्स’? मुश्रीफांवर सतेज पाटलांचा हल्लाबोल; शक्तीप्रदर्शन करणे योग्य होतं का?

दरम्यान, शहादा तालुक्यातील आश्रमशाळेत झालेल्या अन्न विषबाधेच्या घटनेवर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, 11 जुलै 2026 रोजी 157 विद्यार्थ्यांपैकी 29 विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता. या प्रकरणी भोजन पुरवठादार आणि स्वयंपाकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झालेला नाही त्याची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे लहान मुलांच्या आयुष्याशी खेळणे योग्य नाही. या विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि जीवनमानाचा प्रश्न असल्याने तुकाराम मुंढे यांनी याकडे लक्ष घालावे, तसेच याबाबत त्यांच्याशी बोलून तातडीने कारवाई करण्यास सांगणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif On Tukaram Mundhe
Fake Medicine Scam : राज्यात तुकाराम मुंढेंचा धडाका; बनावट औषधांचा मोठा खेळ उघड, महाराष्ट्रासह 4 राज्यांत खळबळ

अर्थ खाते राष्ट्रवादीलाच

खर्त खात्यावर बोलताना, राज्याचे अर्थ खाते राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मिळेल. यासाठी आमच्या पक्षाची बैठक झाली आहे. आता आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असे सांगत भाजप हा शब्द पाळणारा पक्ष असल्याने अर्थ खात्याबाबत दिलेला शब्द देखील पाळला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्थ खाते राष्ट्रवादीकडे जाऊ नये म्हणून मित्रपक्षातून (शिवसेनेतून) काही विरोध असेल, तरी तसे करून चालणार नाही. जे ठरले आहे, त्याप्रमाणेच झाले पाहिजे. आम्ही काही वेगळे मागत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष एकदिलाने काम करत असून पक्षात मतभेद असल्याच्या चर्चां त्यांनी फेटाळल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com