Tukaram Mundhe 
पुणे

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या रडारवर सिया गोयलच्या वडिलांचं दुकान; एका दिवसांत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत मारले सील

Tukaram Mundhe: पुणे शहरातील मार्केट यार्ड परिसरातील घाऊक अन्नधान्य व मसाला व्यवसायही आता अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. इथं भेसळीविरोधातील ‘एफडीए’नं विशेष मोहिम राबवली आहे.

सरकारनामा ब्युरो

- ज्ञानेश्वर भोंडे

पुणे : मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने पुणे भेसळीविरोधातील मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कारवाईचा फटका लोहगड हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सिया गोयलच्या वडिलांना बसला आहे. कारण सियाच्या वडिलांच्या पुण्यातील दुकानावर एफडीएकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भेसळीविरोधातील ‘एफडीए’च्या विशेष मोहिमेत पुणे मार्केट यार्डातील बी. जी. गोयल अँड कंपनी येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल ८ लाख १४ हजार ६३० रुपयांची हळद पावडर, तीळ आणि सोयाबीनचा साठा जप्त करण्यात आला. तर एफडीएच्या पथकाने ज्या दुकानावर धाड टाकून मोठा साठा जप्त केला आहे. तर पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील 'बी जी गोयल अँड कंपनी' नावाचं मसाल्याचं दुकान हे सियाच्या वडिलांचं आहे. त्यामुळे आता सियाच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शहरातील मार्केट यार्ड परिसरातील घाऊक अन्नधान्य व मसाला व्यवसायही आता अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. भेसळीविरोधातील ‘एफडीए’च्या विशेष मोहिमेत मार्केट यार्डातील बी. जी. गोयल अँड कंपनी येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल ८ लाख १४ हजार ६३० रुपयांची हळद पावडर, तीळ आणि सोयाबीनचा साठा जप्त करण्यात आला. शहरातील प्रमुख घाऊक बाजारपेठेत झालेल्या या कारवाईमुळे इतर व्यापाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

तपासणीदरम्यान 'संत' व 'साधू' ब्रँडच्या हळद पावडरीसह तीळ आणि सोयाबीन तेलाचे नऊ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. संबंधित साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये तपासणीत परवान्यावरील आवश्यक बदल न केल्याचे, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील विविध तरतुदींचे पालन न झाल्याचेही आढळून आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि परवान्यातील त्रुटी आढळल्याने संबंधित आस्थापनेला व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे विभागात अन्य ठिकाणीही अन्नभेसळ व प्रतिबंधित पदार्थांविरोधात कारवाया करण्यात आल्या. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात दोन ठिकाणी दूध भेसळीप्रकरणी कारवाई करून संशयित दूध नष्ट करण्यात आले, तर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पुण्यातील बोपोडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन ठिकाणी प्रतिबंधित गुटखा व इतर अन्नपदार्थांचा २२ हजार ७८९ रुपयांचा साठा जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

पुणे विभागात या कारवायांमध्ये एकूण ८ लाख ३३ हजार ३९१ रुपयांचा संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, भेसळ आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT