Vinayak Raut: सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गितेश राऊत यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ठाण्यातील सत्र न्यायालयानं त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. तसंच त्यांना अटकेपासून संरक्षणासंदर्भात कुठलंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळं दोघा पितापुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कोर्टानं विनायक राऊत यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी करताना म्हटलं की, याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा अर्ज अभ्यासून त्यांचा युक्तिवादही आम्ही ऐकून घेतला. राऊत पिता-पुत्रांवर एफआयआरमध्ये अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळं याचिकाकर्त्यांना अंतरिम संरक्षण किंवा अटकेपासून तात्पुरता दिलासा देण्यासारखं कोणतेही ठोस कारण दिसत नाही. त्यामुळं अंतरिम संरक्षणाची ही मागणी फेटाळण्यात येत आहे. मुख्य जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी प्रतिवादीला नोटीस जारी करण्याचे आदेशही कोर्टानं यावेळी दिले. तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जुलै २०२६ निश्चित केली.
दरम्यान, न्यायालयाने विनायक राऊतांना तात्काळ दिलासा देण्यास नकार दिल्यामुळं तसंच पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्यासंदर्भात कुठलेही निर्देश पोलिसांना दिलेले नसल्यानं पोलीस त्यांना चौकशीसाठी २३ तारखेच्या आधी कधीही ताब्यात घेऊ शकतात. त्यामुळं त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
दरम्यान, विनायक राऊत यांची सून गिरीज राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत राऊत कुटुंबियांवर छाळाचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांची पत्नी, मुलगा मुंबई महापालिकेतील नगरसेवक गितेश राऊत आणि इतर लोक अशा ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.