PCMC Drugs  Sarkarnama
पुणे

PCMC Drugs News : ड्रग्ज तस्करीत फौजदाराचाच हात; पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्यापेक्षा वीस पट 'एमडी' जप्त

Pimpri Chichwad Crime News : उद्योगनगरीत अवतरला ललित पाटील, परप्रांतीय हॉटेल कामगाराकडून तब्बल 44 कोटींचे एमडी जप्त

उत्तम कुटे

Pune Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी पोलिसांनी शुक्रवारी (ता. 1) नमामी शंकर झा (वय 32, सध्या रा. निगडी, मूळचा बिहार) या हॉटेल कामगाराकडून दोन कोटी दोन लाख रुपयांचे एमडी हा अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणात शहर पोलिस दलातील निगडी पोलिस ठाण्यावरील विकास शेळके या पीएसआयला (फौजदार) शनिवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चक्क पोलिसाचेच हात अडकल्याने शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. PCMC Drugs News

दरम्यान, झा याची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून आणखी सुमारे ४३ किलो एमडी हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या एमडीची एकूण किंमत 44 कोटी 79 लाख रुपये असल्याचे समोर आले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गेटवर गेल्या वर्षी 1 ऑक्टोबरला दोन कोटींचे एमडी पुणे पोलिसांनी पकडले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी त्याचा मुख्य सूत्रधार ड्रग्ज तस्कर ललित पाटीलने रुग्णालयातून पलायन केले. या राज्यभर गाजलेल्या प्रकरात पाटलाला पलायनाला मदत केल्याने काही पोलिसांना सेवेतून काढून टाकण्यात आले, तर काहींना निलंबित करून अटक करण्यात आली. त्या प्रकरणाशी या ताज्या एमडी साठ्याचे कनेक्शन असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Pimpri Chinchwad)

पुणे जिल्ह्याचे यापूर्वीचे पालकमंत्री चंद्रकांत-पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्जच्या वाढत्या व्यसनाबद्दल मोठी चिंता व्यक्त केली होती. त्यांनी ड्रग्जबाबत नो कॉम्प्रोमाइज म्हणत ड्रग्जमाफियांवर कडक कारवाईचे आदे्श दिले होते. त्यानंतर ललित पाटील प्रकरण समोर आले, तर आता झा पकडला गेला. त्यात थेट पोलिसांचाच सहभाग आढळल्याने ते अधिक गंभीर आहे.

दरम्यान, पुणे पोलिस आयुक्तांनी ललित पाटील पलायन प्रकरणात दोषी पोलिसांवर जसा कारवाईचा बडगा उगारला तशीच कारवाई पिंपरी-चिंचवडमधील झा एमडी प्रकरणातही होण्याची शक्यता आहे.

गस्तीवरील सांगवी पोलिसांना पाहून पळणाऱ्या झा याच्याकडील पिशवीत दोन कोटींचे एमडी शुक्रवारी पहाटे मिळाले होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास अमली पदार्थविरोधी विभागाकडे दिला. त्यांच्या तपासात झा याच्याकडून एमडीचे घबाड हाती लागले. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज त्याला कोणी दिले? ते कोठून आले? याचा शोध आता पोलिस घेत आहेत. त्यातून ललित पाटीलप्रमाणे एमडीचा आणि एक उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT