Uday Samant Sarkarnama
पुणे

Uday Samant Statement : 'अपेक्षित नव्हते असे चेहरे महायुतीत दिसतील', सामंतांच्या विधानाने विरोधकांना धडकी

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, महायुतीच्या माध्यमातून सर्व मित्रपक्ष एकत्रित कामाला लागले आहेत. राज्यात सत्ताधारी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत राज्यातून 45 पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढविण्यात येणार असून, यामध्ये कोणीही नाराज नाही. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपकी बार 400 पार हा नारा घेऊन महायुतीचा कार्यकर्ता कामाला लागला असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती महाबळ शिरूर आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील Shirur loksabha constituency आढावा आज महायुतीचे समन्वयक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. चंद्रकांत पाटील महायुतीतील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे चांगल्या प्रकारचे समन्वयक करत असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.

सत्तेत जे असंतुष्ट आहेत त्यांची जी महाविकास आघाडी झाली आहे. त्यांचा पराभव होऊन नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, हे 4 जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल. पुणे शहरात महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. खऱ्या अर्थाने युतीचा प्रचार कसा करायचा असतो हे आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलेले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच जागा महायुती जिंकेल, असे सामंत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे हे लोक जातील, असे कोणाला वाटले नाही. असे काही चेहरे येत्या आठ ते दहा दिवसांत महायुतीत आलेले तुम्हाला दिसतील. कधीही अपेक्षित नव्हते असे चेहरे यामध्ये असतील, असा दावादेखील उद्योगमंत्री सामंत (Uday Samant) यांनी केला. काही व्यक्तींच्या बोलण्याने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare) हे दुखावले असतील ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आता शिवतारे शिवसेनेत काम करत असल्याने जुन्या गोष्टीमध्ये गुंतून न पडता तडजोड करावी लागते, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या जागावाटपात शिवसेनेला मानसन्मानाने जागा मिळत आहे. कुठेही तडजोड होणार नाही. तीन पक्षाचे सरकार असल्याने ज्या मतदारसंघात एका पक्षाची ताकद अधिक असेल त्या पक्षाला तिथे उमेदवार द्यावा, असे सोपे गणित आहे. महायुतीमध्ये जर का नवीन व्हिडिओ आला आणि ते आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य असेल तर आमचाही त्याला पाठिंबाच आहे, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

भाजप प्रादेशिक पक्षांना संपवत नाही

प्रादेशिक पक्ष भाजपाला संपवायचे असे कुठेही मला वाटत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करून शिवसेनेचा सन्मानच भाजपने केला आहे. प्रत्येक वेळी भाजपने शिवसेनेला सन्मानच दिला आहे. त्यामुळे भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचा आहे ही होणारी टीका निरर्थक असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेवर महादेव जानकर जे आहेत ते भाजपमुळेच आहे. मात्र ते नाराज का आहेत हे मला माहीत नाही. भाजपने त्यांना तिकीट दिले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून आपली नाराजी व्यक्त करावी असे आवाहन त्यांनी जानकर यांना केले.

R

SCROLL FOR NEXT