Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray: पुणे महापालिकेच्या आखाड्यात उतरण्यासाठी ठाकरेंच्या 180 सैनिकांनी थोपटले दंड

Uddhav Thackeray Shiv Sena contesting PMC:मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेने स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवली होती. त्यावेळी 138 उमेदवार शिवसेनेने निवडणूक रिंगणात उतरवले होते.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिंदेंच्या सेनेने लॉन्च केलेल्या मिशन टायगर ची राज्यभर चर्चा आहे. ज्या पद्धतीने राज्यात मिशन टायगर सुरू आहे त्याच धर्तीवर पुण्यामध्ये देखील शिंदेंच्या सेनेकडून मिशन पुणे लॉन्च करण्यात आले आहे.

मिशन पुण्याच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील आणि काँग्रेस मधील नाराजांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेची सेना करीत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंच्या सेनेला आणखी गळती लागण्याची शक्यता असतानाच ठाकरे सेनेने देखील मिशन पुणे लॉन्च केले असून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. ठाकरेंच्या सेनेकडून देखील आगामी महापालिका निवडणुकीसाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याच दृष्टिकोनातून ठाकरेंच्या सेनेने पुण्यामध्ये महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांची मुलाखती घेतल्या. दोन दिवस चाललेल्या या मुलाखतीमध्ये पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातून तब्बल 180 जणांनी शिवसेनेकडून आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.

मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेने स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवली होती. त्यावेळी 138 उमेदवार शिवसेनेने निवडणूक रिंगणात उतरवले होते. या 138 उमेदवारांपैकी सद्यस्थितीला ठाकरेंच्या शिवसेनेसोबत किती उमेदवार आहेत, या गोष्टीची चाचपणी ठाकरेंची सेना करत आहे. या माध्यमातून ठाकरेंची सेना सोबळावरती निवडणुका लढल्यास शहरांमध्ये पक्षाची किती ताकद आहे, याबाबतची चाचणी करत असल्याचं बोललं जात आहे.

याबाबत माहिती देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे म्हणाले, "पुण्यात दोन दिवस घेतलेल्या मुलाखतीमध्ये 180 जणांनी आमच्याकडून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. यामध्ये गेल्यावेळी निवडणूक लढवलेल्या 138 जणांपैकी बहुतांशजण मुलाखतीला उपस्थित होते. मात्र काही जणांना निवडणुकीसाठी येणं शक्य झालं नाही त्या लोकांसाठी पुन्हा एकदा अशा प्रकारचा मुलाखत कार्यक्रम घेण्यात येणार आहे,"

ज्या 180 इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यापैकी 50% उमेदवारांना यापूर्वी निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. तरीदेखील आगामी काळात दोन दिवसांसाठी या इच्छुक उमेदवारांचं प्रशिक्षण शिबिर आम्ही घेणार असून आगामी निवडणुकीच्या दिवशी कोणातून त्यांची तयारी करून घेणार असल्याचं थरकुडे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT