Pune News : विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित आणि धक्कादायक पराभवाचं खापर महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर (EVM) फोडलं आहे. आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमविरोधात मोठी मोहीम उघडल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्याचवेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे EVM विरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरु छेडलं. या आंदोलनाचा शनिवारी (ता.30) तिसरा दिवस होता.
विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित आणि धक्कादायक पराभवाचं खापर महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर फोडलं आहे. आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमविरोधात मोठी मोहीम उघडल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्याचवेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे EVM विरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरु छेडलं. या आंदोलनाचा शनिवारी (ता.30) तिसरा दिवस होता.
या आंदोलनालस्थळाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली. तसेच दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आढावांची भेट घेतली. पण त्यानंतर भेटीसाठी आलेल्या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत आढावांनी आपलं उपोषण सोडलं. पाठिंबा दिला आहे.पवारांनी उपोषणस्थळी जात आढाव यांची भेट घेतली.
पुण्यात ईव्हीएम विरोधात सुरु केलेलं आत्मक्लेश आंदोलन बाबा आढाव यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मान देत त्यांनी आपलं उपोषण पाणी प्राशन करुन सोडलं.
महाराष्ट्र लेचापेचा नाही. महाराष्ट्र देशाला दिशा देईल.महाविकास आघाडीतील शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील.आमच्या ईव्हीएम विरोधातील लढाईला बाबा आढावांच्या या उपोषणानं बळ मिळालं आहे.त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठीच येथे आलो आहे.पण त्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे,अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. या विनंतीला मान देत बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मीडियाशी संवाद साधताना सत्ताधारी महायुतीवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,राज्यात महायुतीला एवढं राक्षसी बहुमत असुन देखील महाराष्ट्रात आनंद का नाही.बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजाअर्चा करण्यासाठी का जाताहेत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच अमावस्येला पूजाअर्चा करण्यासाठी गेलेत यावरुन यांची मानसिकता दिसून येते असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली. यावेळी संजय राऊत आणि सुषमा अंधारे देखील उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले,बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधी आंदोलनाला सुरुवात केली आहे. ही जना आंदोलनाची ठिणगी असून वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते.हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे. योजनांच्या माध्यमातुन सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला आहे.या घोळात एक मोठा विषय ईव्हीएमचा आहे.आपण मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटमध्ये त्या मतदानाची चिठ्ठी पाहायला मिळते. मात्र, ती व्हीव्हीपॅट मोजली जात नाहीत. त्यामुळे माझे मत कोठे जाते हे समजायला हवे,असं उद्धव ठाकरे यांनी याठिकाणी सांगितले.
शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यांच्या उपोषणाला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आता 'सत्यमेव जयते' ऐवजी 'सत्तामेव जयते' सुरु आहे. राक्षसी बहुमत मिळालेले असतानाही लोक राजभवनावर जाण्याऐवजी शेतात पूजाअर्चा करायला का जात आहेत, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. दरम्यान, बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हट्टाला मान देत पाणी घेऊन उपोषण सोडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.