Sharad Pawar : EVM मध्ये घोळ अन् 15 टक्के मतं सेट? मतमोजणी प्रक्रियेवर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "शेवटच्या 2 तासांत..."

Sharad Pawar On EVM : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे EVM विरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलाना जेष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. पवारांनी उपोषणस्थळी जात आढाव यांची भेट घेतली.
Sharad Pawar ON EVM News.jpg
Sharad Pawar ON EVM News.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 30 Nov : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे EVM विरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलाना जेष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. पवारांनी उपोषणस्थळी जात आढाव यांची भेट घेतली. (Sharad Pawar meets Baba Adhaav )

दोघांमधील चर्चे दरम्यान, बाबा आढाव (Baba Adhav) यांनी सरकारला विरोधक नकोच आहेत, असं वक्तव्य केलं. तर आढाव यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करण्यात आल्याचा आणि पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याची लोकांमध्ये चर्चा असल्याचं पवार म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी ईव्हीएम वर संशय देखील व्यक्त केला.

यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना (Sharad Pawar), "काही उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे भरले आहेत. त्यामुळे मजमोजणी दरम्यान काही मतं सेट केल्याचा दावा केला जात आहे. यावर तुमचा विश्वास आहे का?" असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "लोकांमध्ये अशी चर्चा आहे, पण सध्या माझ्या हातात त्याचा काही पुरावा नाही.

Sharad Pawar ON EVM News.jpg
Maharashtra Government Formation LIVE Updates : अखेर मुहूर्त ठरला! मोदींच्या उपस्थितीत 5 डिसेंबरला होणार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

निवडणुकीपूर्वी काही लोकांनी ते कसं सेट केलं जात याबाबतचं प्रेझेंटेशन आम्हाला केलं होतं. मात्र आमची कमतरता की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला वाटलं निवडणूक आयोग (Election Commission) इतक्या टोकाची चुकीची भूमिका घेणार नाही. आम्ही या संस्थेवर गैरविश्वास व्यक्त केला नाही. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर मात्र यामध्ये काहीतरी तथ्य असल्याचं दिसत आहे."

Sharad Pawar ON EVM News.jpg
Murlidhar Mohol : महायुतीत मुख्यमंपत्रिदाचा तिढा अन् भाजपचं धक्कातंत्र! मोहोळ यांच्या ट्विटमुळे सगळंच झालं स्पष्ट

तसंच यावेळी फेरमतमोजणी आणि 15 टक्के मतं सेट केली गेली त्यामुळे तुम्हाला ईव्हीएमवर संशय आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, "फेर मतमोजणीतून काही फारसं पुढे येईल असं वाटत नाही. त्याबाबत मला शंका आहे. तसंच शेवटच्या दोन तासांत 7 टक्क्याच्या वर मतदान झालं त्याबाबतची माहिती अत्यंत धक्कायक आहे. माझा मतं सेट केली यावर आधी विश्वास बसत नव्हता पण आता त्यात तथ्य आहे असं त्यात वाटतयं", असंही पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com