Ajit Pawar : एकनाथ शिंदे गावी जाण्याचं कारण अजितदादांनी सांगितलं; सत्तास्थापनेचा फॉर्म्युला दिल्लीत ठरला

Ajit Pawar Pune Eknath Shinde Satara mahayuti : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी का गेले, याचे कारण अजित पवार यांनी सांगितले आहे.
Ajit Pawar 1
Ajit Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. मुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्री पदावरून महायुतीतील मित्र पक्षांमध्ये चर्चेचे खल सुरू असल्याने सरकार स्थापनेला उशीर होत असल्याचं बोललं जातंय.

यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाची मागणी केली असून ते मिळत नसल्याने ते नाराज आहेते. त्यामुळे ते दोन दिवस गावाला गेल्याची चर्चा ऐकायला मिळतंय, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता खुलासा केला आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उपोषण सुरू केला आहे. या उपोषणाला आज अजित पवार यांनी भेट दिली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "विधानसभेचा लागलेला निकाल हा विरोधकांच्या जिव्हारी लागला असल्याने ते सहनच करू शकत नाहीयेत. त्यामुळे ते आता ईव्हीएमला दोष देत आहेत. हा तर निकाल वेगळा लागला असता, तर आम्ही काही बोललो नसतो मात्र त्यांनी मोठमोठ्या मिरवणुका काढल्या असत्या. परंतु महाराष्ट्रातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळे अशा प्रकारचा निकाल लागला आहे".

Ajit Pawar 1
Sharad Pawar : मुख्यमंत्री पदाबाबत मोठं भाष्य; पवार म्हणाले, 'बहुमताला कोणताही अर्थ..' ...पाहा VIDEO

सुप्रीम कोर्टाने देखील ईव्हीएमबाबत (EVM) तक्रार करणं योग्य नसल्याचे सांगितले आहे. तसंच त्यांनी याबाबतच्या केस दाखल करून घ्यायलाही नकार दिला आहे. आता विरोधक सुप्रीम कोर्टाच ही ऐकायला तयार नाही. तसंच ईव्हीएममध्ये घोटाळा असेल, तर ते समोर ठेवून सिद्ध करून दाखवणे आवश्यक आहे. मात्र विरोध ते हो करायलाही तयार नाहीत. विरोधकांचा हा फक्त रडीचा डाव चालू असून अनेकांचा दारू पराभव झालेला आहे. त्यामुळे ते पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

Ajit Pawar 1
Maharashtra EVM Row : ‘ईव्हीएम’ विरोधात 95 वर्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने थोपटले दंड; आत्मक्लेश उपोषणाला सुरूवात

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी कधी येणार, असा विचारला असता अजित पवार म्हणाले, "अंदाजे पाच तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्र्यांची शपथ झाल्यानंतर खाते वाटप जाहीर करण्यात येणार आहेत". महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये मंत्रीपदाबाबत कोणतीही रस्सीखेच नाही, असे सांगितले.

मुख्यमंत्री कोण होणार याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका जाहीर केली. आम्ही देखील यापूर्वीच आमची भूमिका जाहीर केली आहे. जर भाजपचे 132 आमदार निवडून आले असतील, तर निश्चितच भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत देखील याबाबत निर्णय झाला असून भाजपाचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे हे नाराज असून ते दोन दिवस त्यांच्या गावी गेले आहेत. त्याबाबत अजित पवार यांना विचारला असता अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वजण प्रचारामध्ये अडकले होत. त्यामुळे दोन दिवस सुट्टी आहे. शनिवार रविवार सुट्टी साधून ते गावी गेले आहेत. राज्यात काळजीवाहू सरकार असल्याने जास्त काम नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे सुट्टी घेऊन गावी गेले असल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com