Sanjog Waghere  Sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray News: शिवरायांच्या पुण्यात गद्दारांना गाडा, ठाकरेंचा आदेश

Uddhav Thackeray challenged the Baranes : वाघेरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी बारणेंना ललकारले

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक, त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचव़डचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी आज (शनिवारी) मुंबईत `मातोश्री`वर शिवसेनेत (ठाकरे गटात) प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंना पाहून ते भावूक झाले. हा संदर्भ पकडून भावूक आणि घाऊकमधील फरक समजावून सांगताना पक्ष सोडून गेलेल्यांना नंतर ठाकरेंनी पुन्हा फैलावर घेतले.

वाघेरे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी पन्नास खोके, एकदम ओके, अशा घोषणा देण्यात आल्या. तर, ठाकरेंना पाहून भावूक झाल्याचे वाघेरेंनी सांगितले. हा संदर्भ पकडून ठाकरे यांनी आता आपल्याला भावूक आणि घाऊकमधील फरक कळायला लागला आहे, असे सांगताच उपस्थितांत हशा पिकला. तुमच्यासारखे संवेदनशील शिवसैनिक भगव्यासोबत असताना घाऊक कोण, हे सांगण्याची गरज नाही. त्यांना त्या खोक्यांतच बंद करून टाकण्याची आवश्यकता आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. गद्दारांना गाडण्याची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पुणे जिल्ह्यातून करा, असे आवाहन करीत शिंदे गटात गेलेले मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंना त्यांनी ललकारले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारणेंचे नाव न घेता त्यांची संभावना ठाकरेंनी गद्दार अशी केली. ते गद्दार झाले. सत्ता नसताना तुम्ही (वाघेरे) इकडे आलात आणि ते सत्तेसाठी तिकडे गेले, हा गद्दार आणि स्वाभिमानीतील फरक आहे, असे ते म्हणाले. मावळात प्रचाराला येण्याची गरज नाही, असे सांगत तरी मी येणार, असा शब्द त्यांनी दिला. तसेच मावळात विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही,असा दावाही त्यांनी केला.तो करताना त्यांनी वाघेरे हेच मावळातील शिवसेनेचे उमेदवार असतील, यावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.

होऊ दे चर्चा पुन्हा सुरु करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तसेच केंद्र सरकारची कामे गावागावात सध्या जनतेच्या पैशातून पोचवणाऱ्या भाजपवर ठाकरेंनी यावेळी कडाडून टीका केली. त्यांच्या या आभियानातील फोलपणा दाखवून देण्यासाठी गावागावात पुन्हा 'होऊ दे चर्चा' हा शिवसेनेचा (Shivsena) उपक्रम पुन्हा सुरु करण्यास त्यांनी सांगितले. गेल्या साडेनऊ वर्षांत मोदी सरकारच्या कुठल्या योजनांचा लाभ मिळाला, या काळात त्यांनी काय केले याची चर्चा गावागावात चर्चा होऊ द्या, असे ते म्हणाले.

(Edited By - Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT