Rahul Kalate Sarkarnama
पुणे

Rahul Kalate : राहुल कलाटे शिवसेनेतच; पण ठाकरे की शिंदेंच्या सेनेत?

Pimpri Chinchwad Politics : पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या पाट्या महापालिका प्रशासन त्यांचे कार्यालय आणि निवासस्थानाजवळ लावते.

सरकारनामा ब्यूरो

Pune Political News : गेल्यावर्षी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष लढलेले राहुल कलाटे यांचा आगामी विधानसभाही लढण्याचा बेत आहे.आमदार होण्यासाठी ते यावेळी तुतारी फुंकणार असल्याचे समजते. दरम्यान, ते नक्की कुठल्या शिवसेनेत आहेत, याविषयी संभ्रम असून तो त्यांनीही दूर केलेला नाही.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप Laxman Jagtap यांचे गेल्यावर्षी 3 जानेवारीला अकाली निधन झाले. त्यामुळे तेथे 26 फेब्रुवारी 2023 ला पोटनिवडणूक झाली. त्यात दिवंगत आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी निवडून आल्या. ही निवडणूक शिवसेनेत बंडखोरी करीत कलाटे अपक्ष लढले होते.

तत्पूर्वी, ते महापालिकेत नगरसेवक आणि पक्षाचे गटनेते होते. पण, महापालिकेची मुदत 13 मार्च 2022 रोजी संपल्याने बंडखोरी करूनही शिवसेनेने कलाटेंवर Rahul Kalate शिस्तभंगाची कारवाई केली नाही. त्यानंतर त्यांनी शिंदे शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला त्या पक्षाचे उपनेते आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी विरोध केल्याने तो प्रवेश झाला नाही. त्यामुळे ते नक्की कुठल्या शिवसेनेत आहे, हा संभ्रम शिवसैनिकांतच आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने कलाटे यांच्याबाबतचा संभ्रम आणखी वाढवला आहे. पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या पाट्या महापालिका प्रशासन त्यांचे कार्यालय आणि निवासस्थानाजवळ लावते. मात्र, त्यांची मुदत संपूनही महापालिकेने हे बोर्ड अद्याप तसेच ठेवलेले आहेत.

कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरही तो आहे. त्यावर शिवसेना नगरसेवक आणि गटनेता असा उल्लेख आजही आहे. खरं, तर त्यावर माजी अशी दुरुस्ती प्रशासनाने करणे अपेक्षित होते वा मुदतच संपल्याने ते बोर्ड काढून टाकायला हवे होते.

दरम्यान, कलाटे हे चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात पुन्हा उतरणार असल्याचे समजते. पण, यावेळी ते आघाडीतील शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची चर्चा आहे. पण, आघाडीतील ठाकरे शिवसेनेत ते अद्याप आहेत. त्यातून ते ठाकरे शिवसेनेचीच पेटती मशाल हाती घेणार की तुतारी फुंकणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यांनी तुतारी फुंकण्याचे ठरविले, तर त्यांना पक्षांतर करावे लागेल. एकूणच 2024 ला चिंचवडची लढत महायुती आणि आघाडीतही उमेदवारी मिळण्यापासून अत्यंत चुरशीची होणार, हे मात्र नक्की आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT