Narayan Rane : कोकणातून मी शिवसेना संपवली! ठाकरेंच्या जखमेवर नारायण राणेंनी मीठ चोळलं

Konkan And Uddhav Thackeray : एका निवडणुकीत मताधिक्य मिळाले म्हणून पुढे ते टिकेल, असे नाही. या निवडणुकीनंतर आता आम्ही जागृत झालो आहोत
Uddhav Thackeray, Narayan Rane
Uddhav Thackeray, Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Konkan Political News : नारायण राणे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक. शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्टचे अध्यक्ष, आमदार ते मुख्यमंत्री, अशी पदे शिवसेनेत असताना नारायण राणे यांना मिळाली होती. आता मात्र राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तवही जात नाही. भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणे यांनी कोकणातून मी शिवसेना संपवली असे विधान करून ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

"कोकणातून मी शिवसेना संपवली. पाच जिल्ह्यांत शिवसेना कुठेच नाही. 'कुणी आडवे आले, तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ', असे म्हणणाऱ्यांचा पायच आम्ही बाजूला केला आहे," असा इशाराही नारायण राणे Narayan Rane यांनी दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

लोकसभेला महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले, याबद्दल प्रश्न विचारल्यावर नारायण राणे म्हणाले, "एका निवडणुकीत मताधिक्य मिळाले म्हणून पुढे ते टिकेल, असे नाही. या निवडणुकीनंतर आता आम्ही जागृत झालो आहोत. विधानसभेत हे राज्य जिंकावे म्हणून आम्ही प्रयत्न करणार," असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीत विजय होईल, असा दावा महाविकास आघाडीने केला आहे. त्यावर राणेंनी म्हटले, "आम्हीही सांगतोय, आम्हीच पुन्हा सत्तेत येणार आहोत. आम्ही सत्तेत आहोत आणि राहणारच आहे. जसे केंद्रात भाजप सरकार आले आणि नरेंद्र मोदी Narendra Modi पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे कुणी दावा केल्याने काही फरक पडत नाही."

Uddhav Thackeray, Narayan Rane
Raj Thackeray : मनसेने उडवला धुरळा! विधानसभेच्या पहिल्या उमेदवाराची घोषणाच केली

"कोकणातून मी शिवसेना संपवली. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही. 'कुणी आडवे आले, तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ' म्हणणाऱ्यांचा पायच आम्ही बाजूला केला आहे. कोकणातून साफ केले आहे. आता कुणालाही शिरकाव करू देणार नाही," असा इशाराच राणेंनी ठाकरेंना इशारा दिला आहे. यावर ठाकरे गटाकडून राणेंना काय उत्तर मिळणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray, Narayan Rane
Sandeep Deshpande on Bhujbal : 'राज ठाकरेंविरोधातल्या 'त्या' षडयंत्रात भुजबळही..!'; संदीप देशपांडेंचा खळबळजनक दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com