OmRaje Nimbalkar | Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray Politics : ओमराजे निंबाळकरांच्या नावाची घोषणाबाजी; उद्धव ठाकरेंनी विचारले, किती पैसे मिळाले? अन् 'तो' किस्साही सांगितला!

Uddhav Thackeray Omraje Nimbalkar Shivsena UBT : ओमराजे निंबाळकर यांच्या नावाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर दिल्या. त्यावेळी ठाकरेंनी निवडणुकीतील किस्सा कार्यकर्त्यांना सांगितला.

Roshan More, Sudesh Mitkar

Pune Newe : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी पुण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र या संवाद बैठकीदरम्यान अचानकपणे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाच्या घोषणा देण्यास शिवसैनिकांनी सुरुवात केली. यानंतर उद्धव ठाकरे थेटच विचारलं की तुम्हाला घोषणा द्यायचे किती पैसे मिळाले?

उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपले नऊ खासदार लोकसभा निवडणुकीत तर विधानसभा निवडणुकीत आपले 20 आमदार निवडून आले. ते अब्जाधीश नव्हते तरीदेखील ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी ओमराजेंच्या प्रचारातील किस्सा सांगण्या सुरुवात केली. त्याच वेळी त्याचवेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या नावाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. आणि मोठा टाळ्यांचा कडकडाट झाला.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला विचारलं की 'तुम्हाला ओमराजे निंबाळकर यांनी पैसे दिले आहेत. दिले नसतील तर मग का ? घोषणा देत आहात आणि टाळ्या वाजवत आहात? या ठिकाणी ओमराजे यांचा काही संबंध नसताना त्यांच नाव निघाल्यानंतर घोषणाबाजी झाली, टाळ्या वाजल्या हे कशामुळे तर ओमराजे निंबाळकर यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळे, या सगळ्या गोष्टी होत आहेत. यासाठी पैसा लागत नाही.' असं उद्धव ठाकरे यांनी सांगत ओमराजेंचे कौतुक केले.

शेतकऱ्याची मदत लाखमोलाची...

ठाकरे पुढे म्हणाले, 'ओमराजे यांच्या प्रचारासाठी गेलो होतो तेव्हा प्रचारसभा संपल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावर आला आणि त्यांनी आपल्या छोट्याशा पुरचुंडीमध्ये पैसे घेऊन आला आणि म्हणाला की मला ओमराजे यांना पैसे द्यायचे आहेत. त्या शेतकऱ्याची अवस्था पाहता तो खात काय असेल, आपला उदरनिर्वाह कसात्र चालवत असेल, असा प्रश्न मला पडला. असे असताना देखील त्यांनी ओमराजे यांच्यासाठी पैसे देऊन केले होते. त्याच्या पुरचुंडी मध्ये हजार कोटी असणार नव्हते मात्र त्यामध्ये एक रुपया जरी असला तरी तो 1000 कोटींपेक्षाही मोठा आहे.'

'तो' एक रुपया हजारो कोटींपेक्षा मोठा

शेतकऱ्याच्या त्या एक रुपयांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या हजार कोटी रुपयांना पराभूत करू शकेल एवढी ताकद त्या एक रुपयामध्ये आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आपली सत्ता नसली तरी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे.त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या मदतीला धावून जाणे महत्त्वाचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT