
Judge Dismissal News India : जप्त केलेल्या अमली पदार्थांची तस्करी, तर लाचखोरीचा ठपका असलेल्या न्यायाधीशांवर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईचा बडगा उचलला आहे.
सातारा अन् पालघर इथल्या न्यायालयातील न्यायाधीशांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन न्यायाधीशांना उच्च न्यायालयाने बडतर्फ केल्याने न्याय व्यवस्थेत खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्हा न्यायालयातील (Court) न्यायाधीश धनंजय निकम, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख, या न्यायाधीशांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. एक ऑक्टोबरपासून त्यांना सेवेतून पदमुक्त होण्यास सांगितले आहे.
जामीन मिळावा, यासाठी पाच लाख रुपयांची लाच (Anti corruption bureau) मागितल्याचा आरोप धनंजय निकम यांच्यावर आहे. यात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी सत्र न्यायालयात आणि त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
परंतु धनंजय निकम यांना दोन्ही न्यायालयांनी दिलासा देण्यास नकार दिला. याप्रकरणी त्यांची उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांच्या बडतर्फीचा आदेश काढण्यात आल्याचे समजते.
पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख मुंबईतील बॅलार्ड पिअर न्यायालयात दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याची प्रकरणे त्यांच्याकडे सुनावणीसाठी असायचे. पोलिस कारवाईदरम्यान जप्त केलेला मुद्देमाल म्हणून न्यायालयात सादर केलेल्या अमली पदार्थांची ते तस्करी करायचे, असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आलेली आहे.
तसंच कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीला न्यायाधीश शेख उपस्थित होते आणि त्यांनीही नशा केली होती. परंतु क्रूझवरील पार्टीवर छापा टाकणाऱ्या केंद्रीय अमलीपदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तेथून बाहेर काढले, असा आरोपही याचिकेत करण्यात आला होता. याप्रकरणी शेख यांचीही समितीकडून चौकशी करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.