Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray : सरकारनं परवानगी दिली, अन् कोंडी केली; उद्धव ठाकरेंबाबत नेमकं काय घडलं?

Shivjayanti At Shivneri : शिवनेरीला जाण्यासाठी 19 मार्चला अर्ज पण 27 मार्चला रात्री उशिरा दिल्लीतून मिळाली परवानगी

गणेश कोरे

Maharashtra Political News : शिवनेरी किल्ल्यावर तिथीनुसार गुरुवारी (ता. 28) शिवजयंती साजरी होत आहे. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. त्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरसाठी परवानगीकरिता सुमारे दहा दिवसांपूर्वी अर्ज केला होता. मात्र, सोहळ्याच्या पूर्व रात्री म्हणजे बुधवारी (ता. 27) रात्री उशिरा त्यांना परवानगी देण्यात आली. या परवानगीबाबत त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. परिणामी दौऱ्याच्या तयारीअभावी ठाकरे शिवनेरीवर जाऊ शकणार नाहीत, अशीच तजवीज केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होऊ लागला आहे. Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे तिथीनुसारच्या शिवजयंतीला शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी येणार होते. त्यासाठी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) जिल्हा प्रशासनाकडे आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे परवानगी मागितली होती. या परवानगीचा अर्ज त्यांनी 19 मार्च रोजी संबंधित प्रशासनाकडे दिला होता. त्यानुसार दिल्लीतून परवानगी मिळाली, पण बुधवारी रात्री उशिरा. दरम्यान, परवानगीबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून या दौऱ्याबाबत तयारी केलेली नव्हती. परिणामी पुरातत्त्व विभागाकडून उशिरा परवानगी देऊन केंद्र सरकारने ठाकरे यांची एक प्रकारे कोंडीच केल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात सध्या लोकसभेची धामधूम सुरू आहे. राज्यातही महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जागावाटपातही दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. छोट्या पक्षांना आपल्या गोटात सहभागी करून घेण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. असे असले तरी काही जागांवरील तिढा सोडवताना मित्रपक्षांची नाराजी टाळण्यासाठी दोन्हीकडे कसरत सुरू आहे. यातही भाजप सरकारने शिवजयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) कोंडी करण्याची संधी सोडलेली नाही, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी 28 मार्च सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. तेथे ठाकरेंच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडसाठी खासदार अमोल कोल्हेंनी यांनी 19 मार्च रोजी परवानगी अर्ज केला होता. त्यावर थेट 27 मार्चला रात्री उशिरा निर्णय झाला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या शक्यतेने सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवनेरीवर हेलिपॅड सज्ज करून ठेवले आहे. मात्र, परवानगी उशिराने मिऴाल्याने दौरा अधांतरी झाला आहे.

दरम्यान, या परवानगीबाबत ठाकरे गटातील कुणालाही माहिती देण्यात आली नाही. ऐनवेळी काही तास आधी परवानगी देऊन ठाकरेंची कोण कोंडी करू पाहत आहे, या कुरघोडीमागे नक्की कोण, असे प्रश्न ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून केले जात आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT