Kirit Somaiya Latest News Sarkarnama
पुणे

उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये,आता डावाही जाणार;`समझनेवाले को इशारा काफी है`

Kirit Somaiya : माझ्या आईला, बायकोला हे जेलमध्ये टाकायला निघाले होते...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : लोणावळा (ता.मावळ,जि.पुणे) शहर भाजप कार्यकर्ता मेळावा आज (ता.२३ऑगस्ट) झाला. त्याला पक्षाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (Shivsena) कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व त्यांचे चिरंजीव आणि माजी पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला,आता डावाही जाणार,`समझनेवाले को इशारा काफी है`,असा इशारा त्यांनी दिला. त्यांचा रोख हा शिवसेना नेते आणि परिवहनममंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दिशेने होता.

मविआ सरकारच्या काळात शंभर कोटी रुपयांचा कोरोना घोटाळा झाला असून त्याची चौकशी लवकरच लागणार असल्याचे संकेत सोमय्या यांनी यावेळी दिले. हा पैसा कुठून कुठे गेला हे लवकरच जाहीर करणार आहे. हा चोरीचा माल परत करावाच लागेल,असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच सरकार हे माफियाराज होतं, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. माझ्या आईला, बायकोला हे जेलमध्ये टाकायला निघाले होते, त्यांनी काय केलं. मुलाने काय केलं आहे, अशी विचारणा त्यांनी केली.

माजी राज्यमंत्री तथा भाजपचे मावळचे माजी आमदार बाळा भेगडे, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील इंगुळकर आणि कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका कांचन गायकवाड व इतरांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT