सगळ्यांच्या चिठ्ठ्या माझ्याकडे : `50 खोके, ओक्केवर` मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा...

Eknath Shinde : शिवसेना-बडखोरांमधील संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSarkarnama

मुंबई : सध्या बाहेर जे काही चालले आहे, ते मी पाहतो, ऐकतो आहे. पण एक लक्षात ठेवा माझ्याकडे सगळ्यांच्या कच्च्या चिठ्ठ्या आहेत. मी संवेदनशील आहे. परंतु संयमाला मर्यादा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकप्रकारे विरोधकांना ठणकावले. (Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde Latest News
मुख्यमंत्र्यांनी इशारा देताच धनंजय मुंडे आंदोलनातून गायब!

आंदोलनाआडून बंडखोरांना रोजच हिणवले जात असल्याने संतप्त झालेल्या शिंदे यांनी थेट सभागृहात शिवसेनेला इशारे दिले. परिणामी, शिवसेना-बडखोरांमधील संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेतील नेते थंड झाले असले, तरीही सत्ता गेल्याने शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेते अस्वस्थ झाले आहेत. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटू लागले असून, सरकारविरोधात आंदोलन करताना विरोधक बंडखोरांना लक्ष्य करीत आहेत. विशेषतः '५० खोके, एकदम ओके', अशी घोषणाबाजी करीत विधिमंडळ परिसरात पायऱ्यांवर बसलेले विरोधी आमदार बंडखोरांना डिवचत आहेत. त्यामुळे बंडखोरही आक्रमक झाले आहेत.

अधिवेशनात रोज बंडखोरांविरोधात नव्या घोषणा घुमत असल्याने शिंदे यांनीच आता विरोधकांना खडे बोल ऐकवण्यास सुरवात केली. अधिवेशनात अतिवृष्टीबाबतच्या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी आंदोलन करणाऱ्या आमदारांचा समाचार घेतानाच, एकप्रकारे संघर्षाची भाषा बोलून दाखवली. ते म्हणाले, "नेहमीच राजकारण करण्याची गरज नसते. बाहेर जे सुरू आहे, ते मी पाहतो आहे. मी त्यांच्यापेक्षा चारपट बोलू शकतो. मात्र माझ्या संयमाला मर्यादा आहेत. मुख्यमंत्रीपद डोक्यात गेलेले नाही. मी जमिनीवर काम करणारा माणूस आहे. पहाटे तीन वाजेपर्यंत काम करतो. माझ्या कामाचे तुम्हीच कौतुक करता, असेही ते म्हणाले.

Eknath Shinde Latest News
Supriya Sule : विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार दुर्देवी....सुप्रिया सुळे

दरम्यान, अधिवेशन सुरू झाल्यापासूनच महाविकास आघाडीतील नेते हे चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. त्यांच्याकडून बंडखोर आमदारांना लक्ष करण्यात येत असून त्यांना सातत्याने बंडखोरी करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे सातत्याने होणारी ही टीका बंडखोर आमदारांच्या चांगलीच जिव्हारी लागत आहे. यावर उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरलेले दिसत असून ते विरोध करणाऱ्या नेत्यांचा समाचार घेत आहेत. यावरूनच त्यांनी काल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा देखील दिला होता. त्यामुळेच आज धनंजय मुंडे आंदोलनात दिसले तर नाही ना अशी चर्चाही झाली.

Eknath Shinde Latest News
‘शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत; पण सरकार आपल्याच मस्तीत वागतंय’

तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या या वक्तव्यावर तुम्ही आम्हाला इशारा देताय का, असा प्रश्‍न अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला. पवार म्हणाले, मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा प्रमुख, ही मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी सांभाळताना श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. तुमच्याकडूनही तेच अपेक्षित आहे. पण तुम्ही असा इशारा देताय, हे बरोबर नाही, अशी टीका पवारांनी केली यावेळी पवार बोलत असताना मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलले. त्यानंतर सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com