Indapur News : इंदापूर तालुक्यामध्ये झालेल्या बोट दुर्घटनेमध्ये करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे (वय 16 ) हा पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेतील अपघातग्रस्त बोट सापडली असली तरी यामधून जाणारे प्रवासी मात्र बेपत्ता आहेत. हे प्रवासी दगावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. कुगाव ते कळशी या दरम्यान काल सायंकाळी जोरदार वाऱ्यामुळे उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये सात प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून दुर्घटना घडली. यामध्ये सहा जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बोटीमधून प्रवास करणारा एक जण वाचला आहे. पोहता येत असल्याने ही व्यक्ती वाचली. अपघातग्रस्त बोट 35 फूट खोल पाण्यात सापडली असली, तरी यामधून प्रवास करणारे व्यक्ती मात्र सापडलेले नाहीत. त्यामुळे हे सर्व प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इंदापुर (Indapur) येथील भीमा नदी पात्रात ही बोट बुडाली होती. ही बोट 17 तासानंतर सापडली आहे. मात्र यातील सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याने त्यांचा शोध एनडीआरएफकडून सुरु आहे. या दुर्घटनेमध्ये गौरव डोंगरे हा 16 वर्षीय मुलगा बुडला असल्याची माहिती समोर येत आहे. गौरव हा करमाळा येथील आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा आहे. त्याच्यासह इतर बुडालेल्या प्रवासांचा शोध सुरू असून यामध्ये तीन पुरुष ,एक महिला, व दोन लहान मुले यांचा समावेश आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल दत्तात्रय जाधव (वय 25) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय ३) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय 35) गौरव धनंजय डोंगरे (वय 16 दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत. या सर्वांचा शोध एनडीआरएफ च्या पथकाकडून सुरू आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन केली पाहणी
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या घटनेनंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याचे ट्विट सुळे यांनी केले असून घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक येथे कार्यरत आहे. या घटनेत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून ते सुखरूप असावे, हि ईश्वरचरणी प्रार्थना. अशा भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.