Ramdas Athawale 1 Sarkarnama
पुणे

Ramdas Athawale : नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी शरद पवारांची आवश्यकता; रामदास आठवलेंचं पुन्हा आमंत्रण

Union Minister Ramdas Athawale Pune Sharad Pawar Ajit Pawar BJP NDA : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पुणे इथं झालेल्या पत्रकार परिषद शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याचे आमंत्रण देताना मोठं भाष्य केले.

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जन्मदिनाच्या औचित्य साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली इथं सहकुटुंब भेट घेतली.

यानंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यामधील (PUNE) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रामदास आठवले म्हणाले, "आज भीमा कोरेगावच्या शौर्या गथेला 207 वर्ष पूर्ण झाले आहेत. या ठिकाणी दरवर्षी लाखो अनुयायी अभिवादनासाठी येतात. मात्र आराखड्याची अंबलबजावणी अद्याप झालेली नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचं ते तीर्थ क्षेत्र आहे. याठिकाणी भव्य स्मारक व्हावं ही आमची मागणी आहे".

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद मिळावं, अशी मागणी होती. विधानसभेला एकही जागा आम्हाला सुटली नाही. लोकसभेला 2 जागा मिळाव्यात, आमची मागणी होती. तेव्हाही ते देण्यात आलं नाही. त्यामुळे जे एक मंत्रीपद शिल्लक आहे ते आरपीआयला (RPI) द्यावं, असे ते म्हणाले.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला जागा द्यावात, आणि आरपीआयलाला एक महापौर पद देण्यात यावे, अशी आमची मागणी असणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 22 दिवस झाल्यानंतर जवाब घेतला आहे. वाल्मिक कराड ह्याला ताब्यात घेतला आहे, इतरही आरोप ताब्यात घेण्यात येईल. त्याची चौकशी करण्यात यावी. वाल्मिक कराड गुंड आहे. त्यालाही सजा झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

वंजारीविरुद्ध मराठा, असा वाद नको

आरोपींना पकडण्यासाठी एवढा वेळ लागला नाही पाहिजे. पोलिसांनी यांचा विचार करणे आवश्यक आहे. वंजारीविरुद्ध मराठा, असा वाद होऊ नये. घटनेचा प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आहे, सर्वत्र चर्चा आहे. म्हणून त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये राजकारण करू नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

मुंडेंचा राजीनामा घेण्याची गरज नाही

धनंजय मुंडे यांनी स्वतःनी सांगितले आहे. कितीही जवळचा असला, तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे आठवले म्हणाले. तसेच वाल्मिक कराड फक्त खंडणीच्या गुन्ह्यात न राहता त्याला हत्येच्या गुन्ह्यात घेण्यात यावं, अशी मागणी माझी असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे आठवले यांनी सांगितलं.

पवारसाहेबांनी 'एनडीए'सोबत यावं

शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याबाबत बोलताना आठवले यांनी आमची सुद्धा हीच इच्छा आहे की, शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं. माझी अनेक दिवसांपासून इच्छा आहे की, पवारसाहेबांनी 'एनडीए'सोबत यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी शरद पवार यांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांनी एनडीएसोबत यावं. मी देखील पूर्वी भाजपचा विरोध करत होतो. मात्र आता मी त्यांच्यासोबत आहे. ज्या काँग्रेसने तुम्हाला पंतप्रधान बनवलं नाही. तसेच अध्यक्षही बनवलं नाही. त्या काँग्रेससोबत राहणं योग्य नसल्याचं देखील आठवले यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT