<div class="paragraphs"><p>Sanjay Kale</p></div>

Sanjay Kale

 

sarkarnama

पुणे

अजित पवारांनी तिढा सोडवला : संजय काळे जिल्हा बॅंकेवर बिनविरोध

रवींद्र पाटे

नारायणगाव : पुणे जिल्हा सहकारी बॅंक निवडणूकीमध्ये (Pune District Bank Election) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे (Sanjay Kale) यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांनी आज (ता. २२) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सोसायटीच्या अ गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) पुरस्कृत सहकार पॅनेलचे उमेदवार काळे यांची बिनविरोध निवड झाली.

संजय काळे उपख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. सभापती काळे यांच्या बिनविरोध निवडीचे आमदार अतुल बेनके यांच्यासह तालुक्यातील सहकारी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. सभापती काळे यांचे वडील माजी आमदार स्व.शिवाजीराव काळे सलग ५५ वर्ष जिल्हा बँकेचे संचालक होते. त्या नंतर सभापती काळे यांना संचालक पदाची संधी मिळाली. या माध्यमातून काळे घराण्याची जिल्हा बँकेच्या संचालकपदी सलग ७५ वर्ष वर्णी लागली आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेवरुन सभापती काळे व माजी सभापती लेंडे यांच्यात मागील पाच वर्ष राजकीय वाद निर्माण झाला होता. बँकेच्या मागील निवडणुकीत लेंडे यांचा सभापती काळे यांनी पराभव केला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी लेंडे यांनी अर्ज दाखल केल्याने पुन्हा दुसऱ्यांदा काळे विरुध्द लेंडे यांच्यात राजकीय सामना रंगणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. या लढतीकडे तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांचे लक्ष लागले होते.

अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी शेवटच्या क्षणाला माजी सभापती लेंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या मुळे लेंडे व काळे यांच्यातील असलेला तीव्र राजकीय संघर्ष कमी होणार असल्याचे मानले जात आहे. याचे पडसाद आगामी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमटणार आहेत.

मी लढण्याची तयारी केली होती. मात्र उपख्यमंत्री अजित पवार व आमदार अतुल बेनके यांनी केलेल्या विनंती वरून मी आज माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांनी सांगितले. अजित पवार यांच्यामुळे माझी सलग तिसऱ्यांदा जिल्हा बँकेवर निवड झाली. आमदार बेनके यांनी सुध्दा बिनविरोध निवड होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मी करणार, असल्याचे सभापती संजय काळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT