BJP youth leader Ajinkya Kanchan addressing party workers during a protest meeting in Uruli Kanchan, opposing alleged unfair candidate selection for Zilla Parishad and Panchayat Samiti elections. Sarkarnama
पुणे

Ajinkya Kanchan : आमच्यासोबत जो घात केलाय, त्याचा हिशोब नक्की करणार! अजिंक्य कांचन यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्येच वाद उफाळला

Uruli Kanchan BJP Internal Conflict : उरुळी कांचनमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारीवरून भाजपमध्ये तीव्र असंतोष उफाळला असून अजिंक्य कांचन यांनी घात केल्याचा आरोप करत उमेदवार बदलाची मागणी लावून धरली आहे.

सरकारनामा ब्यूरो

-सुनील जगताप

Pune Uruli Kanchan Politics : उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आलेले उमेदवार चुकीचे तसेच परस्परविरोधी असल्याच्या निषेधार्थ उरुळी कांचन जिल्हा परिषद गटातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रीकृष्ण मंगल कार्यालयात एकत्र येत घेतलेल्या मेळाव्यात जोरदार निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना भाजप युवा नेते अजिंक्य कांचन यांनी सविस्तर भूमिका मांडताना ते म्हणाले की,"गेले अनेक वर्षात आम्ही एक एक कार्यकर्ता जोडला, आम्हाला वरिष्ठ नेत्यांकडून ही जागा लढण्यासाठी व उमेदवार देण्यासाठी सांगण्यात आले. त्यादृष्टीने आम्ही जिल्हा परिषदे साठी जीवन शिंदे यांना तयारी करण्यास सांगितले, तसेच सोरतापवाडी पंचायत समितीसाठी उमेदवार निवडीची बैठक झाली असताना कोणीही लढण्यास तयार नसल्याने पूजा सणस यांना तयारी करण्यास सांगितले.

असे असताना जि.प.उमेदवारीचा "एबी फॉर्म" आम्हाला देऊन, त्यानंतर पुन्हा दुसर्‍याला"एबी फॉर्म"देऊन शेवटच्या क्षणी आमचा घात केला. जर उमेदवारी द्यायची नव्हती तर आम्हाला तसे सांगितले असते तर आम्ही स्वतःहून माघार घेतली असती. आता शेवटच्या क्षणी तुम्ही "दुसर्‍याचं लेकरू आमच्या कडेवर देऊन,हे तुमचेच लेकरू आहे म्हणाल तर आम्ही कसं आमचं म्हणू? ज्यांनी कोणी हे घडवल त्या सगळ्याचा हिशोब केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आता आम्हाला फक्त 2 पंचायत समिती उमेदवारांचे काम करा असं पण वरिष्ठांकडून सांगण्यात येतंय, पूजा सणस ने तर इतकं काम केलं असताना त्यांना उमेदवारी का नाकारण्यात आली? हे अन्याय कारक आहे, त्यामुळेच अजूनही वेळ गेलेली नाही जीवन शिंदे यांना जिल्हा परिषदेची आणि पूजा सणस यांना पंचायत समितीची उमेदवारी जाहीर करा. आम्हाला कुठलाही चुकीचा निर्णय घेण्यास पक्ष (BJP) नेतृत्वाने भाग पाडू नये.

या मेळाव्यात अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्वानुमते उरुळी कांचन जिल्हापरिषद गटातील व उरुळी कांचन-सोरतापवाडी पंचायत समिती गणातील उमेदवार बदलण्यात यावेत असा ठराव करण्यात आला. या मेळाव्याला अजिंक्य कांचन, श्रीकांत कांचन, जिवन शिंदे, सारिका लोणारी, पूजा सणस, अमित कांचन, अक्षय कांचन, ओंकार कांचन, संजय कांचन, बाळा तुपे, रेखा तुपे, मच्छिंद्र कड,प्रसन्न भोर व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT