Political activity intensifies in Baramati as NCP and BJP leaders strategize for Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections amid shifting alliances.
Political activity intensifies in Baramati as NCP and BJP leaders strategize for Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections amid shifting alliances.Sarkarnama

Pune ZP Election : पुणे जिल्हा परिषदेच्या मैदानात अजितदादांचा खास प्लॅन; भाजपला रोखण्यासाठी बारामती पंचायत समितीत तडजोड?

NCP vs BJP Pune ZP Election : बारामतीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व भाजपमध्ये थेट लढत असून, अजित पवारांच्या रणनीतीमुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
Published on

Puen ZP Election : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा नव्या चेहऱ्यांना संधी दिली. पण त्याचवेळी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसने सुपे व शिर्सुफळ पंचायत समिती गणात अधिकृत उमेदवारच दिलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामागे जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्याचे लक्ष्य असल्यामुळे पंचायत समितीच्या जागांबाबत तडजोड करून जिल्हा परिषदेतील स्थान बळकट करण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे भाजपनेही मोट बांधण्याचा प्रयत्न केला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

अजित पवार यांनी नीरावागज गटात भाजप नेते अभिजित देवकाते यांच्या पत्नी शिवानी यांना राष्ट्रवादीत घेत तिकीट दिले आहे. तर शिर्सुफळ गणात बाळासाहेब गावडे यांचा मुलगा अनिकेत गावडे यांच्या विरोधात आणि सुपे गणात उज्ज्वला पोपट खैरे यांच्या विरोधात उमेदवार दिलेले नाहीत. यातून जिल्हा परिषदेची निवडणूक सोपी करण्याचा राजकीय डाव अजित पवार यांनी टाकल्याचे मानले जात आहे.

उज्ज्वला खैरे यांचे नाव राष्ट्रवादीच्या यादीत असले तरी भाजपचे नेते दिलीप खैरे यांनी मात्र त्या भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील, असे स्पष्ट केले आहे. पणदरे गटात मंगेश प्रतापराव जगताप यांना जिल्हा परिषदेचे तिकीट देत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीवेळी झालेली नाराजी दूर करत बेरजेचे गणित त्यांनी साधले आहे. येथे जगताप कुटुंबियांपैकी एक असलेल्या अरविंद जगताप यांचे चिरंजीव सूरज जगताप यांना भाजपने संधी दिली आहे.

Political activity intensifies in Baramati as NCP and BJP leaders strategize for Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections amid shifting alliances.
Daund Politics : अजितदादांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी शहराध्यक्षावर नगरपालिकेचं दबावतंत्र

निंबूत गटात यंदा प्रथमच तालुक्याच्या पश्चिम भागाऐवजी कांबळेश्वरचे पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांना तिकीट दिले गेले. माजी जिल्हा परिषद सदस्या असलेल्या मीनाक्षी तावरे यांचे पती व राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष किरण तावरे यांना पणदरे गणातून संधी दिली गेली. बारामतीच्या राष्ट्रवादी भवनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे प्रशासकीय कामकाज कुशलतेने सांभाळणाऱ्या नितीन अरुण काकडे यांना अजित पवार यांनी यंदा नीरावागज गणातून उमेदवारी देऊ केली आहे.

Political activity intensifies in Baramati as NCP and BJP leaders strategize for Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections amid shifting alliances.
Baramati ZP Politics: 'ZP' च्या निवडणुकीत राजकीय गणितं बदलणार? बारामतीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी...

भाजप- शिवसेना युतीचे प्रयत्न

अजित पवार यांना ताकदीनिशी लढत देण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचे भाजपचे सरचिटणीस अविनाश मोटे यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनीही राष्ट्रवादी व भाजपची बारामतीत कसलीच युती नसल्याचे एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही भाजपसोबत युती केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी नमूद केले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com