Senior police officer Jalinder Supekar under investigation for alleged involvement in ₹550 crore extortion case tied to prisoner bail demands.  Sarkarnama
पुणे

Jalinder Supekar News : कैद्यांकडून जामिनासाठी मागितले तब्बल 550 कोटी! हगवणेंचे मामा सुपेकरांवर आणखी एक गंभीर आरोप

Who Is Jalinder Supekar? Senior Officer Under Fire : जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) या पदावर कार्यरत असताना, 19 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी अमरावती कारागृहाला भेट दिली होती.

Sudesh Mitkar

Pune News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील संशय वाढत असताना, आता हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. अमरावती कारागृहात बंदिस्त असलेल्या नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या कैद्यांकडून सुपेकर यांनी तब्बल 550 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

जालिंदर सुपेकर हे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) या पदावर कार्यरत असताना, 19 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी अमरावती कारागृहाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी गायकवाड बंधूंना भेटून त्यांना जामिनासाठी मदत करण्याच्या नावाखाली 500 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा करण्यात आला आहे.

या आरोपाची अधिकृत तक्रार गायकवाड यांचे वकील ॲड. निवृत्ती कराड यांनी न्यायालयात सादर केली आहे. त्यांनी कोर्टात दाखल केलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, “सुपेकर यांनी स्पष्ट शब्दांत धमकी दिली की, ‘हे सगळं मीच केलं आहे. मीच तुम्हाला अडकवलं आहे. जर पैसे दिले नाहीत, तर तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही.”

तक्रारीत असेही नमूद आहे की, 2024 मध्ये सुपेकर पुन्हा एकदा अमरावती जेलमध्ये आले असता, त्यांनी नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना  मारहाण केली आणि पुन्हा एकदा खंडणीसाठी दबाव टाकला. “मी पुढच्या लोकांना पैसे देतो आणि तुमचं काम करून घेतो. पण त्यासाठी मला पैसे द्या, नाहीतर तुम्हाला कधीच बाहेर येऊ देणार नाही,” अशी धमकी त्यांनी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे सुपेकर यांच्या विरोधातील या तक्रारीकडे विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे. या प्रकरणाची चौकशी न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु होण्याची शक्यता आहे. पोलीस विभागात उच्च पातळीवरुन चौकशीसाठी विशेष समिती नेमली जाऊ शकते. सध्या या प्रकरणातील सर्व बाबी न्यायप्रविष्ट आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT