Raj Thackeray Pune Visit : 'मनसे'अध्यक्ष राज ठाकरे येणार पुण्यात ; युतीच्या चर्चांना फुलस्टॉप अन् स्वबळाची घोषणा होणार?

MNS Pune News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीत शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होणार आहेत.
MNS and Pune municipal election
MNS and Pune municipal electionsarkarnama
Published on
Updated on

MNS and Pune municipal election: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबत जेवढ्या चर्चा चालू आहेत. त्यापेक्षाही जास्त उत्सुकता ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दोन्ही ठाकरे एकत्र येणार याबाबतच्या चर्चा सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांना टाळी देण्यात बाबत सकारात्मक भूमिका समोर आली होती. मात्र त्यानंतर पुलाखालून बरच पाणी गेलं मात्र या चर्चा काही पुढे गेल्या नाहीत. त्यामुळे या टाळ्यांच्या चर्चांना फुलस्टॉप देत स्वबळाचा नारा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सज्ज झाले असल्याचं सांगितलं जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनसेने तयारीला सुरुवात केली असून याचाच भाग म्हणून पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कोणत्याही युती आघाडीचा विचार न करता स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

MNS and Pune municipal election
Kamal Haasan : कन्नड भाषा वाद सुरू असतानाच, कमल हसन यांचा राज्यसभा उमेदवारीबाबत मोठा निर्णय!

याच दृष्टिकोनातून 9 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यामध्ये आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती निश्चित करण्यात येणार आहे. राज ठाकरे पुण्यातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची सोबत बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवणार आहेत. एक प्रकारे राज ठाकरे पुण्यातील बैठकीद्वारे आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा नारळ फोडणार असून आगामी काळातील एकला चलो ची भूमिका देखील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

MNS and Pune municipal election
Shahu Maharaj Chhatrapati and Dhairyashil Mane: खासदारांचे वर्षभराचे रिपोर्ट कार्ड रिकामेच! ; विरोधकांची अडचण, तर सत्तधाऱ्यांचा खोळंबा

तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीत शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होणार आहेत. मनसे पुणे शहरातल्या संघटनेत करणार मोठे फेरबदल करणार आहे. मनसे पुण्यातील सर्व शाखाप्रमुख बदलणार असल्याची माहिती समोर आले आहे. त्यासोबतच मनसे गटप्रमुखांच्या सुद्धा नवीन नियुक्त्या करणार असून या शाखाप्रमुख व गटप्रमुख यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नवीन पद निर्माण करून नव्या नियुक्त्या करणार करण्यात येणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com