Pune News: सुनांना मारहाण करणारे, गुरासारखे राबवणाऱ्या हगवणें कुटुंबियांचे एक एक कारनामे आता उघड होत आहेत. एप्रिल 2023 मध्ये मुळशीत गौतमी पाटील एका बैलासमोर नाचल्याची बातमी आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ वैष्णवी हगवणे हीच्या मृत्यूनंतर पुन्हा व्हायरल होत आहे.
हगवणे कुटुंबाच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त हा लावणी कार्यक्रम आयोजित केला होता. या व्हिडिओ बाबत संबंध महाराष्ट्रात चर्चा असतानाच गौतमी पाटील हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना गौतमी म्हणाली, "वैष्णवीसोबत जे झाले, ते अत्यंत दुर्दैवी आहे. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून जो कोणी आरोपी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या भावना या कस्पटे कुटुंबासोबतच आहेत,"
"आम्ही कलाकार आहोत, बऱ्याच गावी जाऊन आम्ही आमचे कार्यक्रम करत असतो. पुढे काय होईल याबाबत आम्हाला माहीत नसतं तसंच जास्त विचारपूस करणं हे माझं काम नाही. आम्ही फक्त कलाकार असून कला सादर करणे हे आमचं काम आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत माझी एक टीम आहे, ती या सगळ्या गोष्टी बघत असते, असे गौतमी म्हणाली.
हगवणे यांनी आयोजित केलेला कार्यक्रमाचं संपूर्ण मानधन मला मिळालेला असल्याचे देखील गौतमीनं सांगितलं. तसेच तो कार्यक्रम देखील अत्यंत व्यवस्थित झाला. तो व्हिडिओ पुन्हा एकदा आता वायरल झाला आहे. हा व्हिडिओ का व्हायरल होतोय याबाबत मला सुरुवातीला कल्पना नव्हती, मात्र मी त्याची माहिती घेतल्यानंतर मला समजलं की वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मला एकच गोष्ट सांगायची आहे की आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे कुठल्याही गोष्टींसोबत आम्हाला जोडू नका. मला त्याबाबत अधिकची कोणतीही माहिती नाही, असं गौतमी म्हणाली.
गौतमीने महिलांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ती म्हणाली, “ही घटना घडली म्हणून नव्हे, पण मी नेहमीच महिलांना सांगते – कुणालाही घाबरू नका. जे योग्य वाटतं, तेच करा. ‘याला कसं सांगू, त्याला कसं सांगू, घरातल्यांना सांगायचं का?’ असा विचार करत राहू नका. अशा गोष्टी लपवल्याने त्रासच वाढतो. काही चुकीचं घडलं तर लगेच बोलून टाका, निर्णय घ्या आणि स्वतःला मोकळं करा.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.