Vaishnavi Hagwane’s nine-month-old child now in the custody of the Kaspaté family after formal handover. sarkarnama
पुणे

Vaishnavi Hagwane Baby : वैष्णवीचे बाळ आले आजोबांच्या कुशीत; अज्ञात व्यक्तीचा फोन अन् हायवेवर फिल्मीस्टाईलने ताबा...

Vaishnavi Hagwane Case : वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की एका अज्ञान व्यक्तीने हे बाळ आम्हाला आणून दिले. बाळ परत आल्याने आमची वैष्णवीच परत आल्याची आमच्या भावना आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणांमध्ये त्यांचे सासरे राजेंद्र हगवणे हे देखील आरोपी आहेत. सध्या राजेंद्र हगवणे हे फरार असून हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत.त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ हे शशांक हगवणेचा मित्र नीलेश चव्हाण याच्याकडे होते. ते बाळ देण्यास त्याने नकार दिला होता. मात्र, एका अज्ञात व्यक्तीने हे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सोपवले.

वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की एका अज्ञान व्यक्तीने हे बाळ आम्हाला आणून दिले. बाळ परत आल्याने आमची वैष्णवीच परत आल्याची आमच्या भावना आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे बाळ आणण्यासाठी भूकूमला चालले होते. मात्र त्यावेळी त्यांना अज्ञान व्यक्तीने फोन करून बाळ देण्यासाठी येत असल्याचे सांगितले. हायवेवर भेट घेत अज्ञात व्यक्तीने वैष्णवीचे बाळ ताब्यात दिले. दरम्यान हे बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे देण्याची जबाबदारी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांकडे दिला होता.

अजित पवार यांना पत्रकारांनी राजेंद्र हगवणे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले हगवणेशी आपला काही संबंध नाही. आपण लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सविस्तर बोलणार असल्याचे सांगितले आहे. ते वैष्णवीचे बाळ वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील या दोन महिला नेत्या कस्पटे यांच्या घरी जाणार असल्याचेही सांगितले.

महिला आयोगाकडून देखील एक्सवर पोस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये कस्पटे कुटुंबीयांना त्या बाळाचा ताबा देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तसेच आतापर्यंत हे बाळ राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे असल्याचीही माहिती महिला आयोगाच्या ट्विटरमधून देण्यात आले होते. दरम्यान, हे बाळ एका व्यक्तीने आणून कस्पटे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT