Vaishnavi Hagwane Case : वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणेंना अजितदादांचा दणका, थेट पक्षातून हकालपट्टी

Rajendra Hagwane NCP : जी घटना घडली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी म्हटले.
Vaishnavi Hagwane and Rajendra Hagwane
Vaishnavi Hagwane and Rajendra Hagwane Sarkarnama
Published on
Updated on

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, मुलगा शशांक आणि मुलीवर गुन्हा दाखल आहे. वैष्णवीचे पती शशांक, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा फरार आहे. आता या प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातून राजेंद्र हगवणे यांची हकालपट्टी केली आहे.

हगवणे यांच्या हकापट्टीचे पत्र पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव खर्गे यांनी प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील या हकालपट्टीविषयी माहिती देताना म्हटले की, हगवणे पिता पुत्र हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्ते म्हणून होते ते कोणत्याही पदावर किंवा पदाधिकारी नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कार्यकर्ता राजेंद्र हागवणे व सुशील हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी म्हटले की, अजितदादांनी काल पुणे सीपींना फोन करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे सांगितले आहे. अजितदादांनी मागेच आपल्या भाषणात सांगितले होते की चुकीचे वागत असेल आणि तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्याला पोलिसांनी टायरमध्ये घालून मारावे. राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकपट्टी करण्यात आली आहे.

Vaishnavi Hagwane and Rajendra Hagwane
Arjun Khotkar PA Cash : ‘बक्षिस’ मिळणाऱ्या रकमेवरही पाणी फेरलं! 'धुळे कॅश' प्रकरणावर शरद पवारांच्या शिलेदाराने घेतली फिरकी

कौटुंबीक वादाला पक्षाशी जोडू नका

राजेंद्र हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सगळ्या पदावरून त्यांना काढून टाकण्यात आला आहे. जी घटना घडली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मात्र, कौटुंबीक वादाला पक्षाशी जोडून पक्षावर टीका करू नये, असे आवाहन देखील सूरज चव्हाण यांनी केले आहे.

Vaishnavi Hagwane and Rajendra Hagwane
Jyoti Malhotra Controversy : यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा दहशतवादाशी संबंध आढळलेला नाही! पोलिसांनीच दिली कबुली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com