Police begin inquiry into those who may have helped Rajendra Hagwane stay hidden from authorities. sarkarnama
पुणे

Vaishnavi Hagwane: फरार हगवणे बाप-लेकाचा हॉटेलमध्ये मटणावर ताव; पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट? वैष्णवीच्या वडीलांचा दावा

हगवणे बाप-लेक फरार असतानाच लेक हॉटेलमध्ये कोणालातरी भेटल्याचं आणि एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

Mangesh Mahale

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तिचा फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही सध्या बावधन पोलिस ठाण्यात आहेत. त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. स्वारगेट परिसरातून दोघांना अटक करण्यात आली आहे.

अशातच वैष्णवी यांचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणे कुटुंबियांबाबत मोठा दावा केला आहे. हगवणे बाप-लेक फरार असतानाच लेक हॉटेलमध्ये कोणालातरी भेटल्याचं आणि एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. हगवणेंना पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती, जेवणाचे डब्बे मिळत होते, असा गंभीर आरोप अनिल कस्पटे यांनी केला आहे. यामुळे आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सासरच्या व्यक्तींमुळे वैष्णवीचा मृत्यू झाला असा आरोप वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं.

वैष्णवी हगवणे प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैष्णवीचा पती शंशाक यांचा मित्र निलेश चव्हाण यांच्यावर याआधीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीवर अमानुष छळ आणि आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंगचे गंभीर आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहे. यासंबंधित त्याच्यावर २०१९ मध्ये वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलगी आणि सून यात फरक करणाऱ्यांना इशारा दिला आहे. 21व्या शतकात ही गोष्ट घडते हे दुर्दैव आहे, असे फडणवीस म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.

मुलगी आणि सून यामध्ये फरक करणं हे अतिशय चुकीचं आणि फार वाईट आहे. अशा पद्धतीची वागणूक देणे हे पाप असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत हगवणे कुटुंबीयातील प्रकरणात आणि महत्त्वाची माहिती दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT