Vasant More-Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Vasant More News : वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार वसंत मोरे यांना मिळाले 'हे' चिन्ह !

Pune Loksabha Election 2024 : सोशल मीडियावर मोरे यांना फॉलो करणाऱ्या तरुणांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना ते वाजत गाजत जातील, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता.

Deepak Kulkarni

Pune News : मनसेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंचं कट्टर समर्थक असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर बहुजन विकास आघाडीची वाट धरली. 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांनी पुणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर केली आहे. आता मोरे यांना निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी रोडरोलर हे चिन्ह बहाल केले आहे.

पुण्यात आता महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद धंगेकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे (Vasant More) आणि एमआयएमचे अनिल सुंडके अशी चौरंगी लढत होणार आहे. पुण्यात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक मोरे यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

मनसेनेचे 'फायर ब्रँड' नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी गेल्या महिन्यात मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. मोरे यांना लोकसभा निवडणूक लढायची असल्याने त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. वंचित बहुजन विकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली दिली आहे. पुणे (Pune) लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. त्यांच्या आणि कुटुंबीयांकडे 4 कोटी 16 लाख 67 हजार 364 रुपयांची मालमत्ता आहे. त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.

जागावाटपाचा तिढा अखेरपर्यंत न सुटल्याने वंचित बहुजन विकासचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली. त्यानुसार पुणे लोकसभेसाठी आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर मोरे यांनी वंचित विकासमध्ये प्रवेश केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचितमध्ये (Vanchit Bahujan Aaghadi) प्रवेश केल्यानंतरदेखील मोरे सोशल मीडियावर चर्चेत होते. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी काही प्रश्नदेखील सोडविले होते. सोशल मीडियावर मोरे यांना फॉलो करणाऱ्या तरुणांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना ते वाजत गाजत जातील, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र, याला फाटा देत कोणताही गाजावाजा न करता मोरे यांनी आपला अर्ज दाखल केल्याचे दिसून आले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT