vedant agarwal sarkarnama
पुणे

Porsche Hit And Run Case : आजोबांची 'गॅरंटी' अन् आरोपी वेदांतला न्यायालयानं हलक्यात सोडलं

Sudesh Mitkar

Pune Hit And Run Case, 22 May : बड्या बिल्डरच्या लाडक्या अल्पवयीन लेकाने मद्य प्राशन करून बेदरकारपणे गाडी चालवत दोन जणांना चिरडलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासातच अल्पवयीन आरोपी वेदांत अगरवाल ( Vedant Agarwal ) याला किरकोळ अटी शर्तीवर जामीन मिळाला. मात्र, आता या जामिनामागची 'इनसाइट स्टोरी' समोर आलेली आहे. नातवाला सोडवण्यासाठी आजोबांनी 'गॅरंटी' घेतल्याचं पुढे आले आहे.

राज्य सरकारकडून आदेश आल्यानंतर पुणे पोलिसांकडून 'हिट अ‍ॅण्ड रन' ( Pune Hit And Run Case ) केसमध्ये वेगाने तपास करण्यात येत असून रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. भरधाव कारने दोघांना चिरडून जीव घेतल्यानंतर देखील इतक्या सहजतेने वेदांत कसा सुटू शकतो? असाच प्रश्न सर्वसामान्यांना नागरिकांना पडला आहे. त्यामुळे गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय का? असा सवाल पुणेकर विचारात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याच पार्श्वभूमीवर 'हिट अ‍ॅण्ड रन केस'मध्ये वेदांत अगरवालला जामीन कसा मिळाला? बाल हक्क न्याय मंडळ न्यायालयात काय घडलं याबाबतची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत न्यायालयाने वेदांतला फक्त निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांसोबत पंधरा दिवस वाहतुकीचे नियोजन करणं, भविष्यात अपघात दिसल्यास अपघात ग्रस्तांची मदत करणं, अशा अटी घातल्या होत्या.

पण, सुनावनीवेळी आरोपींच्या आजोबांनी आपल्या लाडक्या नातवाला जामीन मिळण्यासाठी तो अभ्यासात लक्ष देईल, वाईट संगतीपासून दूर राहिल, अशी 'गॅरंटी' दिली होती. त्याच आधारावर न्यायालयानं वेदांतला जामीन मंजूर केल्याचं बोललं जात आहे.

वेदांतला मनसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत, असं न्यायालयानं सांगितलं. त्यासह साक्षीदार, पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, पळून जाणार नाही, अशी हमी वेदांत अग्रवालच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT