Vighnahar Cooperative Sugar Factory Election Sarkarnama
पुणे

Vighnahar Sugar Factory Election : विघ्नहर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; पण 'या' 4 जागांसाठी मतदान होणार

Vighnahar Sugar Factory Election 2025 : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक आता 21 पैकी केवळ 4 जागांसाठी होणार आहे. कारण उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर 17 उमेदवारांच्या विरोधात अर्ज भरलेल्या 17 जणांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे आता संचालकांच्या 21 पैकी चार जागांसाठी निवडणूक होणार आहे.

दत्ता म्हसकर

Junnar News, 05 Feb : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक (Vighnahar Sugar Factory Election) आता 21 पैकी केवळ 4 जागांसाठी होणार आहे. कारण उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर 17 उमेदवारांच्या विरोधात अर्ज भरलेल्या 17 जणांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे आता संचालकांच्या 21 पैकी चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.

उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदारसंघातील शिरोली बुद्रुक गटातील 3 जागांसाठी 4 आणि इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघाच्या एका जागेसाठी 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक (Election) लढविणाऱ्या वैध उमेदवारांची यादी याबाबतची बुधवारी (ता.5) प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांना चिन्ह देखील देण्यात आलं आहे.

तर कारखान्याच्या संचालकांच्या चार जागांसाठीच मतदान शनिवारी (ता.15) होणार आहे. तर निकाल रविवार (ता.16) जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत शिरोली बुद्रुक गटातून संतोष बबन खैरे, रहेमान आब्बास मोमीन इनामदार, विद्यमान अध्यक्ष सत्यशील सोपानशेठ शेरकर आणि सुधीर महादू खोकराळे हे उमेदवार आहेत.

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातून सुरेश भिमाजी गडगे, निलेश नामदेव भुजबळ, रहेमान आब्बास मोमीन इनामदार हे उमेदवार असणार आहेत. बिनविरोध उमेदवारांमध्ये उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदारसंघ जुन्नर गटाच्या तीन जागांसाठी अशोक घोलप, अविनाश पुंडे, देवेंद्र खिलारी हे तर ओतूर गटाच्या चार जागांसाठी धनंजय डुंबरे, बाळासाहेब घुले, पंकज वामन,रामदास वेठेकर यांचा समावेश आहे.

तसंच पिंपळवंडी गटासाठी विवेक काकडे, विलास दांगट, प्रकाश जाधव. तर घोडेगाव गटातून यशराज काळे,नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात हे तीन उमेदवार असणार आहेत. यासह अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ आणि भटक्या-विमुक्त जाती- जमाती मतदारसंघांतून अनुक्रमे प्रकाश सरोगदे संजय खेडकर हे प्रत्येकी एक उमेदवार असणार आहेत.

माजी संचालक प्रकाश जाधव, विलास दांगट, सुरेश गडगे यांना नव्याने संचालकपदाची संधी देण्यात आली आहे. तर बाळासाहेब घुले, पंकज वामन, अविनाश पुंडे, रामदास वेठेकर, संजय खेडकर, सुधीर खोकराळे या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले. मात्र कारखान्याच्या हितासाठी सर्वांनी माघार घेतल्याचं प्रमोद खांडगे पाटील यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT