Shinde Sena MLA Vijay Shivtare addressing a campaign rally in Purandar, Pune district, where his controversial remarks against Pawar leaders triggered political backlash. Sarkarnama
पुणे

Vijay Shivtare : शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली; पवारांवर टीका करताना म्हणाले... तुमचे नेते दळभद्री आणि चिंधीचोर...

Pune Purandar Politics : पुणे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी शरद व अजित पवारांवर वादग्रस्त आणि आक्रमक शब्दांत टीका केल्याने राजकीय वाद निर्माण झाला.

Sudesh Mitkar

Pune Shivsena News : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये सत्तेत एकत्र असलेले तीन मित्र पक्ष आमनेसामने उभे टाकले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आली असल्याचं पाहायला मिळत आहे.

यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांची राळ उठली असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे यांच शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहेत. शिवतरे यांनी पुणे जिल्ह्यामध्ये प्रचाराचा धडाका सुरू केला असून विविध ठिकाणी ते प्रचार सभा घेत आहेत याच दरम्यान पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे बोलताना शिवतारे यांनी ही टीका केली आहे.

शिवतारे म्हणाले, शरद पवार हे 4 वेळा मुख्यमंत्री होते तर अजित पवार हे पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यातील सर्व देवस्थानांना त्यांनी या काळामध्ये पैसे दिले मात्र पुरंदरचा खंडोबा त्यांना दिसला नाही. यांनी लोकांवर अन्याय केला आणि तसाच अन्याय देवावर देखील केला आहे.

मात्र मी मंत्री असताना खंडोबा देवस्थानासाठी 349 कोटींचा आराखडा तयार केला होता. अशा प्रकारचे आकडे तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीकडून ऐकले नसतील कारण त्यांचे नेते दळभद्री आणि चिंधीचोर आहेत. मात्र आम्ही 349 कोटीतील 109 कोटी मंजूर करून त्याचं काम अंतिम टप्प्यात आला आहे.

विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबत बोलताना शिवतारे यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले अरे पन्नास वर्षात काहीच केलं नाहीत. करतोय त्याचं उपकार माना असं वक्तव्य शिवतारे यांनी केला आहे.

यामुळे विजय शिवतारे यांनी आक्रमकपणे पवारांना वर टीका केली असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आगामी काळात हे आरोप प्रत्यारोपाचे वारे आणखी जोरदार वाहताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT