Vijay Shivtare : शिवतारेंनी टोचले शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान; ‘पुरंदरमध्ये झालं; पुण्यात करून दाखवा’

Pune Shivsena Politic's : पुरंदरमध्ये शिवसेना येऊ नये; म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 2018 ला प्रचाराची शेवटची सभा पुरंदर येथे घेतली होती. माझ्या सभेला गर्दी होऊ नये; म्हणून त्याच दिवशी त्यावेळी सभा घेतली.
Vijay Shivtare
Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

Pune, 28 March : पुणे शहराबाबत माझी एक खंत आहे. मी पुरंदर तालुक्यात सभा घेतल्या, त्या प्रचंड तुडुंब झाल्या. पण, पुणे शहरात अशी एकही सभा झाली नाही. माझं एक स्वप्न आहे की, पुणे शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एवढी मोठी सभा झाली पाहिजे की, इतिहासात अशी सभा कुठेच झाली नसेल. असा चमत्कार झाला तरच नमस्कार होणार आहे, असे सांगून माजी मंत्री तथा पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी नेमके वर्मावर बोट ठेवत कान टोचले.

शिवसेनेच्या (Shivsena) वतीने पुण्यात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना विजय शिवतारे यांनी पुणे शहरातील पक्षसंघटनेबाबत भाष्य केले, ते म्हणाले, पुरंदरमध्ये शिवसेना येऊ नये; म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 2018 ला प्रचाराची शेवटची सभा पुरंदर येथे घेतली होती. माझ्या सभेला गर्दी होऊ नये; म्हणून त्याच दिवशी त्यावेळी सभा घेतली. पण, तब्बल २६ हजार मतांनी आपण ती निवडणूक जिंकली.

‘शो’बाजी करून निवडणुका जिंकता येणार नाहीत. काम पाहिजे, पक्ष बांधला पाहिजे. बूथ मजबूत बांधा. मतदार यादीवर काम करा. प्रत्येक मतदारसंघात पोहोचा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा. वेळ कमी आहे. महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असं वाटत आहे. हवेत आणि पोस्टर्स लावून यश मिळणार नाही, त्यासाठी काम करावे लागेल. संघटीत पद्धतीने काम करा, तरच निवडणूक जिंकता येतील, असेही आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना सुनावले

Vijay Shivtare
Anna Bansode : अजितदादांच्या कट्टर समर्थकाचं राष्ट्रवादीतील वजन वाढलं; विधानसभा उपाध्यक्षपदाबरोबरच दोन महत्वाचं पदंही सोपवली!

उदय सामंतसाहेब आपल्याला पक्षसंटघटनेकडे प्रचंड लक्ष द्यायला हवं. शिवसेनेची ताकद शहरात कमी आहे, ती उभी करायला हवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी बैठक मुंबईत घ्यावी, सगळ्यांना बोलवावं. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकत्रित बैठक घ्या. पुण्यातील लोकांना आणि पत्रकारांनाही बोलवा. पुण्यातील लोकांना कळलं पाहिजे की एकनाथ शिंदेंचे पुणे शहराच्या विकासाकडेही तेवढचं लक्ष आहे, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.

Vijay Shivtare
Mahayuti Politics : अजितदादांच्या बालेकिल्ल्यावर शिंदेसेनेचा डोळा; बड्या नेत्याचा शिवतारेंना सल्ला, ‘राजकारणात काहीही होऊ शकतं; शिवसेनेचे आमदार...’

पुणे महापालिकेत शिवसेनेचे कमीत कमी 50 ते 60 नगरसेवक निवडून आले पाहिजेत, असं टार्गेट ठेवून काम करा. त्यासाठी संघटना बांधा, विजय नक्की होईल. शहरातील सर्व 162 वॉर्डात तयारी करा. जिथे काम करा तिथे ताकद आपल्याला किंवा भाजपला नक्की कामी येईल. भाजपसोबत युती होईल की नाही, हा नंतरचा प्रश्न आहे. पण, आपल्या पक्षाची आणि संघटनेची ताकद 162 वॉर्डात वाढवा. सर परशुराम महाविद्यालयाच्या प्रांगणात एकनाथ शिंदे यांची एक लाखाची सभा करू, हेच टार्गेट ठेवावे, अशी सूचनाही शिवतारेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com