Sangram Bhandare On Ink Attack Vikas Lavande  sarkarnama
पुणे

Vikas Lavande Vs Sangram Bhandare : शाई फेकीनंतर संग्राम भंडारे यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, 'लवांडे, थांबले नाहीत तर...'

Ink Attack On Vikas Lavande : आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा-तुकोबांचे वारकरी आहोत. म्हणून आम्ही काळी शाई ओतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय, असे संग्राम भंडारे म्हणाले.

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज सकाळी काही तरुणांनी शाही फेक करण्यात आली. संग्राम भंडारे आणि इतर जणांनी ही शाईफेक केल्याचे समोर आले. दरम्यान, संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत गुंडानी आपल्याला बंदूक दाखवून धमकावल्याच लवांडे यांनी सांगितलं होतं. तसेच याबाबत तातडीने गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक करावी, यासाठी त्यांनी लोणी काळभोर या ठिकाणी ठिया देखील मांडला होता.

त्यानंतर आता शाही फेक करणारे संग्राम भंडारे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. संग्राम भंडारे म्हणाले, विकास लवांडे हे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गुरुवर्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानाचा मोठा केला, त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधानं करत होते. त्यांना 'घुसखोर' म्हणत असेल, 'धर्मांध' म्हणत असतील, 'मनुवादी' म्हणत असतील, तर ते आम्ही कसं सहन करणार.

गेल्या अनेक दिवसांपासून लवांडे हे सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर टीका करत करून वेगवेगळे आरोप करत आहेत. त्यांनी आमच्यासारख्यांना काय भिडायचंय त्याने भिडावं ना! पण गुरुवर्यांची टीका आम्ही सहन करू शकत नाही.

आमच्यासाठी 'गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव दुजा पाहता नाही त्रैलोकी'. त्यामुळे विकास लवांडेयांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळी शाई ओतली. बाकी तो जे खोटारडे आरोप करतोय की मला पिस्तूल लावलं, माझ्यासमोर गुंड उभे केले हे खोटे आरोप असल्याचा दावा देखील भंडारे यांनी केला आहे.

तसेच 'तुका म्हणे संतापीडिती जे खळ, घेती तोंडे काळी करुनिया' ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय. आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलंय 'भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा'. 'मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे'.

आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा-तुकोबांचे वारकरी आहोत. म्हणून आम्ही काळी शाई ओतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्यांना पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावे लागेल असा इशारा देखील भंडारे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT